Skip to content

संपूर्ण आयुष्यात तीनदा येते “साडेसाती ” जाणून घ्या सविस्तर माहिती आणि त्यावरील उपाय.

नमस्कार मित्रांनो.

तुम्हाला माहित आहे का आपल्या संपूर्ण आयुष्यात साडेसाती तीनदा येते. त्यातली मग कोणती फलदायक असते, कोणती त्रासदायक असते चला माहित करून घेऊयात. मित्रांनो साडेसाती विषयी संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आज मी तुम्हाला देणार आहे. ग्रह मालिकेतील सर्वात महत्त्वाचा ग्रह शनी जो शिस्तबद्ध आहे. पण त्याला भावना नाहीत असा अजिबात नाही. घरात कोणाचाच धाक नसेल तर आपल आयुष्य आणि कुटुंब दिशाहीन होईल.

कोणी तर हवच ज्याला आपण उत्तर द्यायला बांधील आहोत. अगदी तसंच शनि महाराजांचा आहे. त्यांचा धाक आहे म्हणून आपण जरा तरी नीट वागतो. पण म्हणून सर्व जनतेने त्यांना विलन जे ठरवले आहे ते योग्य नाही. शिस्त कोणालाच नको असते आणि शिस्त लावणारा डोळ्यासमोरही नको असतो. पण ती आहे म्हणूनच आयुष्याला वळण आहे. शनि आहेत म्हणून जीवनाला अर्थ आहे.

शनी महादशा किंवा शनी साडेसाती आली की कोणीतरी जवळचा गेल्यासारखा चेहरा बसलेल्या लोकांना सांगावस वाटत की तुम्ही भाग्यवान आहात. कारण आता तुम्हाला शनी दशा साडेसाती येत आहे. अजिबात घाबरू नका शनि घ्यायला नाही तर द्यायला येत आहेत. फक्त आपल्याला घेता आला पाहिजे. शनि महाराजांना का घाबरायच कारण तो आपले वाईट करणार मोठे आजार देणार विलंबाने बरी होणारी दुखणे मानसिक त्रास देणार.

सर्व अडथळे आयुष्यात निर्माण करणार. हे आपण गृहीत धरतो आणि इथेच चुकतो. शनि महाराज कोणी परके नाहीत. तर तो आपला सखा आहे. त्यांनी आणि गुरु दोघेही अध्यात्माचे मोक्षाचे ग्रह फक्त त्यांचे दोन्ही मार्ग वेगवेगळे आहेत. आता मोक्ष कोणी पाहिलाय. हा ही एक प्रश्नच आहे. पण असा वागलात तर नरकात जाल तसा वागलात तर स्वर्गात जाल. या धाकाने तरी आपले जीवन बदलेल नाही का? साडेसाती चंद्रालाही लागते.

चंद्र म्हणजेच मन आपण केलेल्या चुका त्याची फळ प्राप्त होण्याची वेळ म्हणजे साडेसातीचा काळ आपल्या चुकांची ओझे आपल्यालाच पेलेनेसे झाले म्हणून आपली झोप उडते. निद्रा नाश हे साडेसातीचे पहिले पाऊल. शनि महाराज आपल्या चुकांची जाणीव करून देतात. त्यातून तुम्ही सुधारलात. त्या मान्य केल्यात आणि नीतीने वागलात बर बर नाहीतर मग आहेस त्याचा दंड आयुष्यभर आपण सतत दुसऱ्यांना दोष देत असतो.

अर्धा आयुष्य आपल दुसऱ्यांना अक्कल शिकवण्यातच निघून जाते. पण आपल्या स्वतःच्या अवगुणांच काय म्हणूनच साडेसाती म्हणजे आत्मपरीक्षण आपल्या आज डोकावल तर वेगळ्याच विश्वाचे दर्शन घडेल. ते आपल्याला करायला शनि महाराज शिकवतात. शनि जीवनाला वळण लावतो. संकट समई आपला कोण हे दाखवणारा तो म्हणजे शनी. आपल्याला जगाची अगदी जवळून ओळख करून देणारा शनि महाराज.

कष्टाची भाकरी किती गोड आहे आणि इतर मार्गाने मिळवलेले लक्ष्मी कशी निशिप्त आहे त्याची जाणीव करून देणारा सुद्धा शनि महाराज. अहंकार सगळ्यांना पाण्यात बघणारे व्यक्ती त्यामुळे साडेसाती आली की एका मागून एक दणके बसायला लागतात. ज्याची कधीही शक्यता वर्तवली जात नाही. या गोष्टी प्रत्यक्षात घडायला लागतात आणि झोप उडते.

मनोमनी जरी आहे आपल्या कुकर्माचा फळ आहे याची जाणीव झाली तरी सुद्धा शनि महाराजांवर त्याचा खापर फोडणे चालूच असत. अरे अरे किती सांगावे किती बोलावे पण शहाण्याला सुद्धा न कळावे हीच खरी शोकांतिका अशा न पळता भुई थोडी झाली नाही तर नवलच. चुका करताना आपल्याला शनीची आठवण येत नाही. मग आता कशाला भीती वाटायला हवी.

इतका माज आहे ना तर भोगायला सुद्धा तयार रहा. याउलट चे नम्र आहेत. यांचा आयुष्य शनि महाराज एका वेगळ्याच उंचीवर नेतो. नोकरी विवाह उच्च शिक्षण पद नवीन वस्तूंचा लाभ एक ना दोन अशा सर्व गोष्टी त्याने महाराज प्रधान करतो. तेही मुक्त हस्ताने हे बक्षीस असत चांगल वागण्याच आणि पुढेही चांगल वागत राहण्याच म्हणूनच शनीला कर्मफलदाता असे म्हटले आहे. जस कर्म तस फळ आपला आजचा जन्म हे आपल वास्तव असल पण या आधी सुद्धा आपण अनेकदा जन्म घेतला आहे हे खर प्रत्येक जन्मात कर्म केले आहेत.

अर्थात चांगले किंवा वाईट त्या सर्वाचीच फळे भोगण्यासाठी मग पुढील जन्म घेत राहतो. म्हणूनच आता या सर्वांची जाणीव झाल्यावर तरी निदान उरलेला जन्म चांगली कर्म करण्यात घालूया. काय पटतय का त्यांनी माझा अपमान केला आता मी त्यांचा अपमान करणार ही शूनक कला आपली मोडली पाहिजे. जाऊदे त्याचा कर्म त्याच्यापाशी पण मी माझे कर्म आता वाढवणार नाही. असा विचार करून जीवन चुकीच्या गोष्टींपासून वाचवली पाहिजे.

शनी महादशा किंवा साडेसाती नाही आलं तरी आपण जगण सोडतो का श्वास घ्यायचा बंद करतो का नाही ना उलट शनि साडेसाती महादशा आली तर उपासना वाढवावी. उत्तम उपासक शनी राहूच्या दहशतच तयार होतात. काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारखे आहेत त्या गोचरीचा शनि मूळ शनि वरून किंवा समोरून जाताना त्रासदायक परिस्थिती असते. अनेक आव्हाने समोर येत राहतात.

त्यांनी जर पत्रिकेत षेष्ठ स्थानी असेल तर विलंबी आजार होतात आणि ते अगदी तुम्हाला स्मशानापर्यंत नेऊन पोचवतात. पण शष्ट स्थान हे रोजच्या कर्माचे स्थान आहे. शनी तुमच्या कर्माचा हिशोब ठेवणार आहे. त्यामुळे तुम्ही रोजचे कर्म उत्तम केले तर शनीचा दुष्परिणाम कमी व्हायला मदत होते. अभाल वृद्धांची सेवा उपासना आपण बर आपल काम बर दान यासारख्या गोष्टी आपल्या आयुष्या सुखकर करतात.

सर्वात मुख्य म्हणजे आपला अहंकार त्याच्यावर अंकुश ठेवता आला पाहिजे. अहंकार हा सर्वात आणि विनाशच कारणीभूत ठरतो.शनी राहू शनी केतू शनी मंगळ शनि रवी या युती पत्रिकेत काहीतरी परिणाम करणारच. ते आपले प्रारब्ध आहे. पण म्हणून आपण जगायच सोडून देत नाही. त्यांनी महाराज आपले निकट आहेत आणि त्यांची आपल्या प्रत्येक व्यक्तीवर दृष्टी आहे. त्याचा विसर पडू दिला नाही.

तर अनेक अनर्थ ठरतील नाही का. सर्व आहे पण मनाची शांतता नाही. झोप नाही ही अवस्था शनिच करू शकतो. म्हणूनच वृद्धांची सेवा चतुर्थ श्रेणीतील लोकांना भूतदया दाखवणे. यात सातत्य बाळगावे. सर्वप्रथम मी काय तो एकटा शहाणा इतर मूर्ख हे वागण सोडून द्या. कोणाच्याही आर्थिक स्थितीवर हसू नये. कोणालाही कमी लेखू नका. पुढील आयुष्यात आपल्यावर काय आहे हे आपल्याला माहित नाही.

शनि साडेसाती शनि महादशा यामध्ये करायचे काही उपाय देखील आहेत.

१) अहंकार त्यागावा २) मंगळवारी मारुतीचे दर्शन घ्याव
३) मंदिरात शनी किंवा मारुतीच्या चेहेऱ्याकडे न बघता चरणांकडे बघून नतमस्तक व्हाव. ४) कणकेचा दिवा अकरा शनिवार चढत्या आणि अकरा शनिवार उतरते मारुतीच्या मंदिरात लावावा.

५) ओम शं शनैश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. ६) एका मातीच्या पणती तेल भरून घ्याव त्यात आपला चेहरा पहावा. नंतर ते तेल मारुतीच्या मंदिराची समय असते त्यात ते घालावे. आपली पीडा त्यात जळते असे म्हणतात. ७) हनुमान चालीसा नित्य पठण करावे.

८) पुण्यातील ताटा सोडून द्या. ९) अपंग वृद्ध मंडळी यांची सेवा करावी. १०) अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *