Skip to content

सणासुदीला सुवासिनी जेव का घालतात. जाणून घ्या यामागील शास्त्रीय कारण.

नमस्कार मित्रांनो.

मंडळी लक्ष्मी प्रसन्न व्हावी अस वाटत असेल तर गृहलक्ष्मी तृप्त असायला हवी. हा संसाराचा मूलमंत्रच आहे. मात्र कामात गुंतून गेली की ना स्वतःकडे लक्ष देते ना कोणाचे तिच्याकडे लक्ष जाते. मात्र भारतीय संस्कृतीत घराघरातली तिची आठवण ठेवत. वृत्त वैखल्याच्या निमित्ताने पूर्वपार तिचा सन्मान केला आहे. कारण हल्ली सणासुदीला प्रत्येक घरात सुहासिनी जेवायला घालतात. या मागचा धर्मशास्त्राचा अर्थ जाणून घेऊयात.

मित्रांनो रोजचा संसार नोकरी मुलांच्या शाळा अभ्यास नवऱ्याचा डबा घरच्यांचे जेवण नाष्टा यात गुंतलेली गृहिणी नवऱ्याने बाहेर जेवायला जाऊया का विचारल्यावर आनंदून जाते. कारण सकाळ दुपार संध्याकाळ रांधा वाडा उष्टी काढा करून ती दमून जाते. कंटाळून जाते.

आजही ७० टक्के घरात हेच चित्र आपल्याला दिसेल. त्यामुळे हॉटेलमध्ये जाऊन आयते गरमागरम जेवणे आणि त्यानंतर पसारा आवरावा न लागणे यातच तिला आनंद असतो. मात्र पूर्वी हॉटेलमध्ये जेवणे असभ्यपणाचे लक्षण मानले जात होते.

घरातील पुरुष हॉटेलला जात नसत तर स्त्रियांचे जाणे दूरच सगळ्यांना गरमागरम जेवण वाढणारी,दुसऱ्यांचे आवडी निवड जपणारी ती आयते जेवण मिळण्यापासून वंचितच होती. अशा अन्नपूर्णेला पहिल्या पंक्तीचा मान मिळावा म्हणून धर्मशास्त्राने सण उत्साहाच्या निमित्ताने सुहासिनी जेवू घालण्याची प्रथा सुरू केली असावी. सण उत्सवाच्या निमित्ताने आप्तेष्टांच्या घरी बोलवल्यावर जाऊन पाटावर आयते बसायचे.

येत्यात जेवायचे आणि तृप्ती तिची ढेकर द्यायची. हा आनंद कोणत्याही संसारी स्त्रीसाठी शब्दाधिक असतो. तसेही रोज रोज आपल्याच हातच जेवून तिला कंटाळा येतो. म्हणून यानिमित्ताने झालेली चव बदल तिला रुजते. हॉटेलमध्ये एखादी पोळी ही रोटी एखादी एक्स्ट्रा घेतली तरी तिचे पैसे मोजावे लागतात. याउलट जेवायला मानाने बोलावल्यावर अगत्याने प्रेमाने पोळीचा भाताचा गोडाचा आग्रह केला जातो.

त्या पाहूनचाराने ती सुखावते आणि मनापासून आशीर्वाद देते. वास्तुला लाभदायी ठरतात. तृप्त झालेल्या आत्माच या सदिच्छा देऊ शकतो. म्हणून आपल्या संस्कृतीत अन्नदानाला महत्त्व दिले आहे. भुकेल्या माणसाला अन्न आणि पैसे यातून काय निवडणार असे विचारल्यास तर तो अन्न निवडेल.

कारण पैसे कधीही कमवता येतात मात्र दोन वेळेची भूक क्षमवता येत नाही. गृहिणीला स्वगृही जेवण मिळतेच पण अशा पद्धतीने केलेला तिचा आधार सत्कार तिला नवीन ऊर्जा उत्साह आणि प्रसन्नता देतो. म्हणून सण उत्सवाला तिला जेवू घालने हे तिचे माहेरपण करण्यासारखेच असते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *