Skip to content

सप्टेंबर महिन्यात या ५ राशींना गणपती बाप्पा पावणार म्हणजे पावणारच.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्राप्रमाणे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या सप्टेंबर महिना अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात गणेश उत्सव साजरा केला जाईल. आणि त्यानंतर पितृपक्षात पितरांचा स्मरण केलं जाईल. आणि उत्तरतः नवरात्र उत्सव सुरू होईल. त्यामुळे आगामी दिवस धामधुमीचे असणार यात काही शंकाच नाही. 

या सगळ्या धामधुमीमध्ये सप्टेंबर महिन्यात तीन ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. १७ सप्टेंबर रोजी नवग्रहांचा राजा सूर्य आपले स्वामित्व असलेल्या सिंह राशीतून बुधाचे स्वामित वाचलेल्या कन्या राशीत प्रवेश करेल. आणि नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध दहा सप्टेंबरला स्वराशीत म्हणजेच कन्या राशीत वक्री होणार आहे.

२४ सप्टेंबरला शुक्र कन्या राशीत विराजमान होईल. पण याआधी १५ सप्टेंबरला शुक्र सिंह राशीत अस्तंगत होईल. आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या बाराही राशींवर होईल. या तीन ग्रहांच्या स्थितीतील बदलामुळे काही राशींच्या व्यक्तींना करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत तसेच पैशाच्या बाबतीत विशेष फायदा होणार आहे. 

या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चांगले बदल घडू शकतात. कोणत्या राशींच्या व्यक्तींना त्याचा लाभ होईल चला जाणून घेऊया. त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे वृषभ रास.

वृषभ रास- वृषभ राशीच्या व्यक्तींना सप्टेंबर महिना शुभ ठरू शकतो. करिअरच्या दृष्टीने त्यांना फायदा होणार आहे. ऑफिस मधील वरिष्ठांकडून त्यांना खूप सहकार्य मिळेल. व्यवसाय करणारे ही पुढे जातील आणि उद्योग क्षेत्रातील लोकांमध्ये सुद्धा तुमचा दर्जा वाढेल.

जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते त्यांनाही या महिन्यात चांगले निकाल मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या भावंडांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. या काळात जोडीदाराशी बोलताना थोडी काळजी मात्र घ्या. 

मिथुन रास- या राशीच्या व्यक्तींना सप्टेंबर महिना यशकारक ठरू शकतो. तुम्हाला प्रत्येक बाबतीत यश मिळू शकेल. तुमचे व्यावसायिक जीवनही उजळेल. तुम्हाला तुमच्या प्रमोशनशी संबंधित बातम्याही मिळू शकतात. तुमच्यावरील तणावही कमी होईल. व्यवसायाशी निगडित लोकांनाही नशिबाची साथ मिळेल.

तुम्हाला परदेशात जाण्याची संधी सुद्धा मिळू शकते. पण त्याचबरोबर कौटुंबिक बाबतीतही तुम्हाला काही चढउतारांना सामोरे जावे लागेल. वाद वाढवणे ऐवजी ते टाळण्यातच शहाणपणा आहे हे लक्षात ठेवा. आरोग्यासाठी अनुकूल कालावधी असू शकेल. 

कर्क रास- या राशीच्या व्यक्तींना सप्टेंबर महिना सौभाग्याचा ठरू शकेल. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना उत्तम संधी मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणातही फायदा होईल. आणि कौटुंबिक जीवन सुद्धा चांगले होईल. प्रत्येक बाबतीत तुम्हाला घरच्यांचे सहकार्य मिळेल. आगामी काळात अडकलेले पैसे मिळू शकतात. आणि तुम्हाला लाभही मिळू शकतो. आरोग्याच्या बाबतीत यावेळी थोडी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. 

कुंभ रास- कुंभ राशीच्या व्यक्तींना सप्टेंबर महिना लाभदायक ठरू शकतो. संपत्ती आणि समृद्धीच्या बाबतीतही महिना खूप खास असणार आहे. भाग्य तुमची साथ देईल. आणि तुम्हाला प्रत्येक बाबतीत यश मिळेल. व्यवसायिक लोकांनाही चांगल्या संधी मिळतील. हा काळ तुमच्या कंपनीसाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरू शकतो.

 तुम्ही खूप दिवसांपासून उच्च शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर हा महिना तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो. जोडीदारासोबत एकत्र कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅनही तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुमचं मन अध्यात्माकडे सुद्धा वळेल. 

मीन रास- मीन राशीच्या व्यक्तींना सप्टेंबर महिना भाग्यकारक ठरू शकतो असं म्हणायला हरकत नाही. करिअरच्या दृष्टीने लाभाचा काळ आहे. आणि तुम्ही जिथे काम कराल तिथे तुम्हाला चांगले स्थळ मिळेल. तुम्हाला इतर अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकत. आणि शिक्षणाच्या बाबतीतही तुम्हाला संमिश्र परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत हा काळ खूप चांगला जाईल. 

तुमच्या कुटुंबात परस्पर संबंध चांगले राहतील. वैवाहिक जीवन आणि प्रेमाच्या दृष्टीने सुद्धा हा काळ चांगला आहे. तर मंडळी गणपती बाप्पा या राशींसाठी काहीतरी खास घेऊन येतोय. हे नक्की मग कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *