Skip to content

सर्व प्रकारच्या आजारावर स्वामी समर्थांची ही सेवा करावी.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आरोग्य सेवा सर्व प्रकारच्या आजारावर स्वामींनी सांगितलेली ही आरोग्य सेवा आहे. जर तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात स्वामींची सेवा करतात. आणि तुम्हालाही हवी असेल की आरोग्य सेवा पाहिजे ही आरोग्य सेवा मी रोज करू शकतो. जेणेकरून आमचे स्वास्थ आमच्या आरोग्य चांगले राहील. तर मित्रांनो ही सेवा नक्की करावी. 

मित्रांनो या सेवेमध्ये तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ ओम हनुमंताय नमः ओम दाताय नमः ओम नमः शिवाय ओम मच्छिंद्रनाथाय नमः हा संपूर्ण एक मंत्र आहे. या मंत्राचा जप तुम्हाला तीन माळ करायचा आहे. या झाल्यानंतर तुम्हाला तीन माळ ओम राम रीम रक्ष रक्ष शिव गोरक्ष या मंत्राचा जप सुद्धा तीन माळी करायचा आहे. 

त्यानंतर तुम्हाला ११ वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर तीन वेळेस तुम्हाला महामृत्युंजय मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर एक वेळेस तुम्हाला कालभैरव अष्टक बोलायचे आहे. आणि त्यानंतर एक वेळेस मारुती स्तोत्र बोलायच आहे. त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय एक वेळेस वाचायचा आहे. 

तरी खूप मोठी सेवा आहे परंतु तुम्हाला जर एवढ सगळ करायचे जमत नसेल तर तुम्ही जे ११ वेळेस आहे तीन वेळेस आहे तीन माळी आहे ते तुम्ही एक एक वेळेस करू शकतात. 

ज्या मंत्राच्या तीन माळी सांगितल्या आहेत तिथे एक माळ करू शकतात. जो मंत्र अकरा वेळेस सांगितलेला आहे तो एक वेळेस करू शकता. जर तुम्हाला जमत नसेल तर.

पण ही सेवा संपूर्ण करायला पाहिजे. तुम्ही संख्या कमी जास्त करू शकतात पण सेवा संपूर्ण करायला घेतली पाहिजेत. यासाठी मित्रांनो तुमच्याकडे आयुर्वेदिक अगरबत्ती असली पाहिजे. तुम्ही स्वामींच्या केंद्रात किंवा अशा ठिकाणी जा जिथे अगरबत्ती मिळते. त्यांना खास करून सांगा की आम्हाला केमिकल नसलेली आयुर्वेदिक अगरबत्ती पाहिजे.

इतर कोणतीही अगरबत्ती या सेवेमध्ये वापरायची नाही. फक्त आयुर्वेदिक केमिकल नसलेली अगरबत्ती तुम्हाला घ्यायची आहे. आणि ती अगरबत्ती लावूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्यासोबत तुम्हाला एक तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक तुळशीचं पान टाकून त्या तांब्यावर आपला डावा हात ठेवून सेवा करायची आहे. 

म्हणजे एका ताब्यात पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये तुळशीचे पान टाकायचे आणि त्या ताब्यावर आपला डावा हात ठेवायचा. म्हणजे डाव्या बाजूलाच तो तांब्या ठेवायचा. आणि हात ठेवून मग आपण उजव्या हाताने माळ जप करू शकतो किंवा जे वाचन आहे जे मंत्र जप आहे जे स्तोत्र आहे जे पारायण आहे ते आपण करू शकतो.

सेवा पूर्ण झाल्यावर जी आयुर्वेदिक अगरबत्ती आपण लावलेली आहे ज्याच्यात केमिकल नाही. त्याची जी पडलेली रक्षा असेल ती आपण सगळ्यात आधी कपाळाला लावावी. त्यानंतर गळ्याला लावावी आणि थोडी रक्षा जिभेने चाटून घ्यावी. आणि उरलेली रक्षा थोडीफार चिमूटभर तांब्यामध्ये टाकून ती आपण पाण्यामध्ये पिऊन घ्यावी. 

तसेच जे तुळशीचे पान आपण टाकलेल आहे ते सुद्धा चावून आपण खायचे आहे. आणि तांब्यातील तीर्थ शिल्लक ठेवू नका सगळं पाणी तुम्हाला प्यायच आहे. मित्रांनो ही सेवा तशी तर सकाळ-संध्याकाळ करायची असते. पण तुम्हाला दिवसातून एक वेळेस जमली तरी चालेल.

 मित्रांनो ही सेवा एकाच व्यक्तीसाठी असून याच्यातील तीर्थ दुसरे कोणीही घेऊ नये. आणि ही सेवा सलग २१दिवस करावी. मित्रांनो ही सेवा करत असताना आपण पोटभर जेवण करावे. आणि कुठलेही मनात वाईट विचार आणू नये. मनापासून श्रद्धेने ही सेवा करावी. जो व्यक्ती ही सेवा करत आहे त्याच व्यक्तीला या सेवेचा लाभ होईल. 

तर जर भरपूर व्यक्ती असतील त्यांनाही सेवा करायची असेल त्यांना लाभ हवे असतील तर त्यांनी सुद्धा ही सेवा करायची आहे. जो व्यक्ती तांब्यावर हात ठेवून ही सेवा करेल त्याच व्यक्तीला या सेवेचा लाभ मिळेल. आणि त्याच व्यक्तीने हे तीर्थ सुद्धा प्यायचे आहे. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *