Skip to content

साप्ताहिक राशिफाळ ०८ ते १४:- या सप्ताहात ७ राशींच्या जीवनात घडणार चमत्कार.. वाढेल आत्मविश्वास… जाणून घ्या सविस्तर….

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो व्यक्तीची राशी त्याच्या जीवनासाठी अत्यंत अनमोल असते. राशी भविष्य यावर आपले सुखदुःख देखील अवलंबून असते. ग्रहाने दिशा बदलली तर आपल्या राशीवर देखील त्याचा मोठा परिणाम होत असतो. आपली आर्थिक स्थिती एक तर सुधारते किंवा घटत जाते त्यामुळे सुख सुविधा सुद्धा एकतर वाढतात किंवा कमी होतात. वेळोवेळी आपण हे राशिभविष्य जाणून घेणे गरजेचे असते.

राशिभविष्य मुळे आपल्या जीवनात कोणते संकट येईल याची एक छोटीशी झलक आपणाला पाहायला मिळते त्यामुळे आपण थोडेफार सावध होतो. मित्रहो येणारा सप्ताह आपल्या राशीसाठी काय नवीन घेऊन येईल हे जाणून घेण्यासाठी अनेक लोक फार उत्सुक आहेत आज या लेखांमधून आपण या सप्ताह बद्दल खास माहिती घेणार आहोत.

मेष :- ८ ते १४ ऑगस्ट, या सप्ताह मध्ये मेष राशीच्या व्यक्तींचे जीवन अतिशय सुखमय जाणार आहे. पैसे कमावण्यासाठी विविध साधने उपलब्ध होतील मात्र अपेक्षेप्रमाणे फायदे होणार नाहीत, स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. या सप्ताहात आपणाला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळणार असून जे लोक राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा सप्ताह अतिशय उत्तम आहे. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत च्या गाठीभेटी होतील, रखडलेल्या कार्यात गती येईल, कार्य मार्गी लागेल. प्रेम संबंधात सकारात्मक बदल होतील, वास्तविकतेचे भान ठेवून अपेक्षा राखल्या जातील. नोकरी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा काळ उत्तम असून त्यांना एखाद्या चांगल्या जॉब साठी कॉल येऊ शकतो, आरोग्य चांगले राहील सोबतच ज्या पदार्थांमध्ये कोलेस्टेरॉल जास्त आहे त्या पदार्थांना टाळावे.

मिथुन :- मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ उत्तम आहे. आपल्या गोड वाणीने सर्वांची मने जिंकून घ्याल सोबतच परिवारासोबत चांगले रिलेशन राहील, आपल्या पूर्वजांच्या प्रति मान सन्मान राखावे. घरातील वृद्ध व्यक्तीची सेवा करावी, मेहनत भरपूर करावी व्यवसाय क्षेत्रात आपणाला भरपूर यश मिळणार आहे. पैसे कमवण्यासाठी नवीन साधने उपलब्ध होतील सोबतच आर्थिक स्थिती सुधारेल मात्र वायफळ खर्च अधिक होईल. 

प्रेमवीरांसाठी हा सप्ताह अनुकूल आहे, तुमच्या भावनांची कदर केली जाईल. जे लोक सरकारी नोकरीमध्ये कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या चांगल्या परफॉर्मन्ससाठी पुरस्कार मिळण्याचा योग आहे, आरोग्य चांगले राहील, अधिक अन्नग्रहण केल्याने त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे आहारामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे.

कर्क :- हा सप्ताह कर्क राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक असेल, जर व्यक्ती नोकरी क्षेत्रात कार्यरत असेल तर त्या क्षेत्रात बढती मिळेल त्यामुळे इतर विरोधी किंवा आसपासचे सहयोगी मार्गात अडचणी निर्माण करतील. घाई घाईत कोणताही निर्णय घेऊ नये. सामंजस्याने प्रश्न सोडवावेत, परिस्थिती हाताळावी, एखाद्या नवीन कामाची सुरुवात लाभदायक ठरू शकते. 

आर्थिक स्थिती उत्तम राहील, आपल्या प्रभावी कार्यशैलीमुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील, सोबतच हा काळ आपल्या मनातील प्रेम भावना एखाद्या प्रति असेल तर ती त्याला स्पष्ट सांगण्यासाठी अनुकूल आहे. जर व्यावसायिक क्षेत्रामध्ये करिअर करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे. आरोग्य चांगले राहील, उठताना बसताना थोडीफार काळजी घेण्याची गरज आहे.

सिंह :- सिंह राशीतील व्यक्तींसाठी हा सप्ताह अनुकूल आहे मात्र या सप्ताहामध्ये खर्चा अधिक होऊ शकतो, पैशाचे महत्व जाणून आहात म्हणूनच जपून ठेवलेले पैसे आता कामी येतील. कामाच्या ठिकाणाची विनाकारण होणारी बोलणे मनावर मेंदूमध्ये साठवू नये त्याचा त्रास करून घेऊ नये, आपल्या घरात एखादी नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे.

सोबतच आपत्याकडून शुभ वार्ता कानावर येईल. करिअर क्षेत्रात नवीन संधी लाभेल, जीवनातील पार्टनर बाबतीत काहीसा संयम दाखवणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांना त्यांच्या मेहनतीनुसार यश प्राप्त होईल, तुम्ही तुमच्या कार्यकरणाच्या पद्धतीमध्ये बदल करू शकता. मानसिक तणाव घेऊ नये ,आहारामध्ये हलके काहीतरी खावे.

कन्या :- या सप्ताह मध्ये आर्थिक स्थिती उत्तम राहू शकते सोबतच पैशांची बचत होईल. जीवनात पुढे जाण्यासाठी अनेक मार्ग मोकळे होतील, करिअर साठी धनलाभ होण्याचा योग आहे. एखाद्या नवीन कार्यासाठी सुरुवात करण्याची इच्छा होईल मात्र जिद्दीने कोणताही निर्णय लगेच घेऊ नये. थोडाफार विचार करावा, तुम्ही भावुक असल्याने लोक तुमचा फायदा घेऊ शकतात. 

जीवनातील पार्टनर आणि रिलेशनशिप याबाबतीत सकारात्मकता जाणवेल. जे लोक लेखन आणि कला क्षेत्राशी निगडित आहेत त्यांच्यासाठी नवनवीन संधी उपलब्ध होतील, आपल्या स्किल्स आणखीन डेव्हलप करण्याकडे लक्ष केंद्रित होईल. विनाकारण प्रवास होण्याचा योग आहे त्यामुळे आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो.

तुळ :- या राशीतील लोकांसाठी हा सप्ताह अनुकूल आहे. भावांच्याकडून किंवा मित्रांच्या कडून मदत न मिळाल्याने अडचणी निर्माण होतील, आपली आवक वाढवण्यासाठी एखाद्याची मदत मिळू शकते, आपणाला नशिबाची साथ मिळेल. ऑफिसचे काम उत्तम रीतीने पार पडेल, तुमच्या कार्यामुळे सहकारी खुश राहतील.

 इतरांच्या जीवनात जास्त लक्ष देऊ नये. रागावर ते नियंत्रण ठेवावे अन्यथा पूर्ण होत आलेली गोष्ट बिघडू शकते. वैवाहिक जीवनात नवनवीन आनंद मिळेल सोबतच त्यामुळे आपले मन प्रसन्न राहील. करिअर संबंधी चिंता राहील आपली मेहनत चालू ठेवावी, आरोग्य उत्तम राखण्यासाठी भरपूर वेळ मिळेल.

वृश्चिक :- या राशीतील लोकांसाठी हा सप्ताह अनुकूल आहे, अधिकाऱ्यांसोबत समतोल राखण्याचा प्रयत्न ठेवावा सोबतच भेटवस्तू घेण्यात येण्यापासून बचाव करावा. आर्थिक स्थिती चांगली होईल मात्र खर्चादेखील अधिक होणार असल्याने वाईट वाटेल. संपत्ती पासून लाभ होण्याचा योग आहे, आपले ध्येय पूर्ण होऊ शकते. पैसे गुंतवण्याची इच्छा असेल तर हा काळ त्यासाठी अनुकूल आहे.

 उधारीवर दिलेले पैसे परत मिळतील. जीवनातील प्रेम संबंधांच्या बाबतीत सकारात्मक बदल होतील एखाद्या रोमँटिक ठिकाणी प्रवास करण्याचा योग आहे. विद्यार्थी मित्रांसाठी आपले करिअर अधिक उत्तम करण्यासाठी संधी मिळतील. आरोग्याच्या बाबतीत जे लोक आधीच हॉस्पिटलमध्ये भरती आहेत त्यांनी आपल्या आरोग्यावर लक्ष द्यावे.

धनु :- या शब्दात धनु राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती उत्तम होऊन त्या आर्थिक अडचणी असतील त्या दूर होण्याचा योग आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संबंध चांगले प्रस्थापित होतील. तुमच्या उत्तम कार्याचे कौतुक केले जाईल, तुमच्या यशाचा स्तर सर्वांच्या पेक्षा अधिक असेल. समाजात मिळून मिसळून राहण्याची संधी मिळेल.

एखाद्या जुन्या चिंतेतून सुटका होईल सोबतच अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रेम जीवन साधे राहील आपल्या जोडीदारासाठी काहीसा वेळ काढण्यात येईल, करिअरमध्ये बढती मिळेल लाभाची संधी आहे सोबतच यशाचे मार्ग मोकळे होतील. आरोग्य चांगले राहील मात्र बाहेर खाणे पिणे टाळावे.

मकर :- या शब्दात्मकर राशींच्या लोकांची चांगले गुण असणाऱ्या व्यक्तींसोबत किंवा घरातील नातेवाईकांसोबत गाठीभेटी वाढतील, व्यवसायात वातावरण चांगले राहील. कला किंवा संगीत क्षेत्रात आवड वाढेल. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे अन्यथा एखाद्याच्या मनाला आपले बोलणे लागू शकते, पैशामुळे एखाद्या सोबत भांडण तंटा होण्याची शक्यता आहे. कुटुंबात धार्मिक कार्य होईल.

एखाद्या जुन्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे. प्रेमवेरांसाठी हा काळ उत्तम असून आपल्या जोडीदारा प्रति असलेल्या भावना व्यक्त करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे, चांगली वेळ आहे. समाजात मान सन्मान मिळेल करिअरमध्ये बढती मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी पोटात दुखणे किंवा जळजळ होणे अशा वेदना होऊ शकतात. म्हणूनच आपल्या खाण्यापिण्यावर लक्ष देणे गरजेचे आहे.

कुंभ :- कुंभ राशीतील व्यक्तींना त्यांच्या नातेवाईकांच्याकडून त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे मानसिक तणाव वाढेल, तरुण वर्गाचा आपल्या मित्रांसोबत चांगला व्यवहार राहील. टीम वर्कमुळे एखादे काम सहज पूर्ण होईल, विनाकारण चा खर्च आणि विवाद यापासून दूर राहावे. अपत्यासाठी पैशाची गुंतवणूक करून ठेवण्यात येईल.

वरिष्ठांकडून आपल्या कार्याचे योग्य फळ लाभेल. कळत नकळत आपल्या जोडीदाराचे मन दुखवले जाईल, व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असाल तर हा काळ आपल्यासाठी उत्तम आहे. यामध्ये आपणास चांगला फायदा मिळेल सोबतच आरोग्य चांगले राहील मात्र तणावापासून दूर राहावे.

मिन :- मीन राशीतील व्यक्तींनी कोणालाही उदार पैसे देऊ नये सोबतच उधारी देण्यापासून बचाव करावा, ठरवून ठेवलेल्यापैकी काही कामे अपूर्ण राहतील त्यामुळे मनावरचा तणाव वाढेल, शैक्षणिक कार्यात यशस्वी राहाल. धैर्यशील तेच कमीपणा येईल सोबतच परिवारातील समस्या त्रास देतील. या राशीतील विद्यार्थी मित्रांचे अभ्यासात मन लागेल.

सरकारी कामातील व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याचा योग आहे. जोडीदार आपल्या मनातील भावना स्पष्टपणे सांगू शकणार नाही आणि त्यामुळे तुम्ही त्यांना व्यवस्थित समजू शकणार नाही. व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी हा काळ सामान्य आहे. शरीरात कॅल्शियम कमी झाल्यामुळे पाय दुखण्याची समस्या निर्माण होऊ शकते. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा पुरेपूर वापर करावा.

मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *