Skip to content

सिंह राशीचा स्वभाव जाणून घ्या. A To Z माहिती विस्तार मध्ये.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य असून या व्यक्ती उत्तम व्यवहारी असतात. तसाच या व्यक्तींचा आत्मविश्वास अतूट असतो. आणि यामुळे समोरच्या माणसावर या व्यक्ती त्यांची छाप सोडतात. तसेच या व्यक्ती शांत स्वभावाचे असतात. आपल्या कामात अत्यंत इमानदार असून आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती कडून त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याची इच्छा मनात बाळगतात.

पण या व्यक्तींना कोणाचा त्रास झाला तर त्या व्यक्तीला या राशीच्या व्यक्ती अजिबात माफ करत नाहीत. तुमच्या जवळची व्यक्ती जर सिंह राशीची असेल तर नक्की अशीच आहे का हे तुम्ही बघून नक्कीच ठरवू शकता. तर चला मग जाणून घेऊया सिंह राशीचा स्वभाव कसा असतो.

ज्योतिष शास्त्र प्रमाणे प्रत्येक माणसाचा जन्म हा वेगवेगळ्या वेळेत आणि वेगळ्या महिन्यात होत असतो.त्यानुसार त्यांचा स्वभाव आणि इतर गोष्टीही बदलत असतात. प्रत्येक राशी चे वेगळे वैशिष्ट्य असते. याच आधारावर त्या व्यक्तींचा चांगुलपणा आणि वाईटपणा आत ठरत असतो. आपण आता या व्यक्तींचा स्वभाव जाणून घेऊ शकतो.

सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्याने त्या व्यक्तीमध्ये नेतृत्वाचा गुण असतो. प्रत्येक कामामध्ये या व्यक्ती पुढे असतात. ज्यामुळे प्रत्येकाच्या नजरा या व्यक्तीवर असतात. या व्यक्तींना आपल्या भावनांवर ती नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे या व्यक्ती बरेचदा मनापेक्षा डोक्याने जास्त विचार करतात. 

अतिशय प्रॅक्टिकल विचार करून या व्यक्ती आयुष्यात पुढे जातात. सिंह राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चढउतार येतात. पण त्यामुळे कोणत्याही बाबतीत हार स्वीकारणं या व्यक्तींना मान्य नसतं. आपल्या सौंदर्यावर आणि आपल्या प्रतिमेवर या व्यक्तींना अभिमान असतो. त्यामुळे या व्यक्ती बऱ्याच सा गर्विष्ठ सुद्धा असतात.

या राशीच्या व्यक्ती जेव्हा प्रेमात असतात. त्या खूपच उत्साही असतात. सिंह राशीच्या व्यक्तीसाठी प्रेम म्हणजे सर्व काही. सुरुवातीला रोमान्स गिफ्ट आणि आपल्या साथीदाराची भरपूर काळजी या राशीची लोकं घेतात. एकदा का त्यांच्या प्रेमाची कबुली मिळाली या व्यक्ती आपल्या प्रेमाच्या माणसालाही गृहीत धरतात.

यांची प्रेम स्वीकारल्यानंतर या व्यक्तींचा स्वाभिमान अधिक बळावतो. जिथे प्रतीकच सिंह आहे त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असणार. तुम्हाला वेगळा अंदाज लावण्याची गरज भासत नाही. त्यांचा राग कोणालाही आवरत नाही. राग आल्यावर या व्यक्तीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत कठीण होते. आणि या व्यक्ती स्वतः देखील स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही.

पण या व्यक्तींना योग्य कारणाचाच राग येतो. आपला राग चुकीचा आहे हे कळल्यावर स्वतःहून माफी मागणं हे या व्यक्तींना जमत नाही. या व्यक्तींना खूपच आत्मविश्वास असतो. लोकांचा जरी ऐकलं तरीही स्वतःच्या मनाची खरे करायचे हे यांचे वैशिष्ट्य आहे.

पलीकडच्या दृष्टीने पाहिल्यास हे अतिशय प्रतिकूल असतात. तसेच पैसा कसा कमवायचा याकडे यांचे जास्त लक्ष असते. या व्यक्ती चांगल्या उद्योगपती इंजिनीयर शिक्षक अथवा कलाकार होऊ शकतात. तर बोलण्याच्या बाबतीतही या व्यक्ती पुढे असतात.

पण प्रयत्नांच्या बाबतीत या व्यक्ती जरा कमी असतात. या व्यक्ती अतिशय आळशी असतात. एखादी गोष्ट कोणा  साठीही केली तर या व्यक्ती सारखेच ऐकवत राहतात. आळशी इतका जास्त असल्यामुळे बऱ्याचदा कामाकडे दुर्लक्ष करतात. आपल्या मनाचे हे राजा असतात.

एखादी गोष्ट आवडली नाही तर ती गोष्ट कशी टाळायची याचे अनेक उपाय व्यक्तींकडे असतात. मेहनतीच्या कामापासून जास्तीत जास्त दूर राहता येईल असाच यांचा प्रयत्न असतो. आपल्या जवळच्या व्यक्तींनी त्यांच्या मनातील आपली जागा दुसऱ्याला देऊ नये याच गोष्टीची भीती असते.

नातं असो वा नोकरी असो ज्यांच्याकडून प्रेम आणि प्रशंसा मिळते अशाच व्यक्तींना या व्यक्ती आपलं मानतात. पैशाच्या बाबतीत त्या व्यक्ती नशीबवान असतात. यांना नेहमीच कुटुंबीयांचा पाठिंबा मिळतो.

 तर खर्च करताना या व्यक्ती खूपच कंजूस असतात. यांचा भाग्यशाली क्रमांक २, ४, ६, १० आणि १६, २५ आहे. यांचा शुभ रंग सोनेरी पांढरा आणि लाल भाग्यशाली दिवस शुक्रवार आणि रविवार यांचा शुभ खडा माणिक पुष्पराज असा आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *