“सैराट” फेम आर्चीने नागराज मंजुळे बद्दल केला मोठा खुलासा….सांगितल अस काही जे ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो २०१६ मध्ये एका रात्रीत सर्वांची शुद्ध हरपून नेणारा चित्रपट “सैराट”, भलताच लोकप्रिय झाला आहे. चित्रपटाचे खास वैशिष्ट्य असे की याच्या कथे सोबतच याच्या संबंधित असणारे सर्व कलाकार विशेष गाजले. इतकेच नसून त्यांच्या आयुष्याची कहाणी सुद्धा लोकांच्या समोर आली आहे, येतील प्रत्येक जण हलाखीच्या परिस्थितीत हा चित्रपट करत होता आणि याच्या यशाने या प्रत्येक कलाकाराचे आयुष्यच बदलून टाकले आहे. 

यातील आर्ची आणि परशा प्रचंड प्रसिद्ध झाले आहेत, आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू आणि परशा म्हणजेच आकाश ठोसर हे दोघे कलाविश्वात एका दमातच यशस्वी झाले आहेत. रिंकू आणि आकाश सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात, त्यांच्या अनेक पोस्ट पाहायला मिळतात. अलीकडेच अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, तिचा हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे. 

यावर अनेक लोक खूपशा निरनिराळ्या कमेन्ट करत आहेत. मित्रहो रिंकू राजगुरू हिने “सैराट” मध्ये अतिशय बिनधास्त भूमिका साकारली होती. तिचा यातील बिनधास्त पणा पाहून मुलींच्या मनात देखील एक निराळाच हुरूप शिरला आहे. खाली मान घालून चालणाऱ्या मुली तिचा बिनधास्तपणा पाहून स्वतःही बिनधास्त झाल्या असून मुलींची मानसिकता बदलली आहे. 

मित्रहो अभिनेत्री रिंकू हिची एक मुलाखत सध्या व्हायरल होत आहे, या मुलाखतीत रिंकूला एक प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न देखील काही साधा सोपा नव्हता, अगदी धर्म संकटात टाकणारा प्रश्न होता हा. मात्र अभिनेत्री या प्रश्नाला अगदी बिनधास्त सामोरी गेली आहे. हा प्रश्न चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बाबतीत होता. 

मित्रहो नुकताच रिंकूचा “आठवा रंग प्रेमाचा” हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे, यामध्ये अभिनेत्रीने ऍसिड हल्ल्यात सापडलेल्या अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर तिची एक मुलाखत घेण्यात आली होती.

या मुलाखती मध्ये रिंकुला विचारण्यात आलेला प्रश्न आणि त्यावरचे तिचे उत्तर प्रचंड चर्चेत आले आहे. यामध्ये रिंकुला “नागराज मंजुळे यांच्या पाच अशा गोष्टी सांग ज्या तुझ्या सहज डोक्यात जातात.” या प्रश्नावर रिंकू खूप वेळ विचार करते, तिला काही सुचत नसत पण तिला थोडा फोर्स केल्यावर ती बोलू लागली “ते कोणाचेच ऐकत नाही.

स्वतःच्या मतावर ठाम असतात. ते म्हणतात तेच खरे असत, ते डोक्यात नाही जात पण आम्ही सगळे बघत असतो.” एवढं बोलून ती विषय थांबवते “आण्णांना माहितेय मी फक्त तुमच्या मुलाखती बाबतीत हे बोलत आहे. हे खरं नाहीये.” डोक्यात जाणाऱ्या सोड पण त्यांच्या हृदयात जाणाऱ्या गोष्टी कोणत्या ते सांग अस म्हणल्यावर ती बोलू लागते.

“त्यांना आपण जीव लावला की ते ही आपल्याला तितकाच जीव लावतात. ते दिग्दर्शक म्हणून अत्यंत हुशार आहेत आणि कवी म्हणून कोणीही त्यांच्या प्रेमात पडेल.” अस ती म्हणते. तिचे हे बोलणे सोशल मीडियावर खूप लक्षवेधी ठरले आहे. 

रिंकू नेहमीच कोणत्या ना कोणत्या करणारे चर्चेत येतच असते, ती नेहमी अशीच प्रसिद्ध आणि लोकप्रिय राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की संगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published.