Skip to content

“हेरा फेरी 3” मधील वादावर सुनील शेट्टीनी घेतली उडी, म्हणाले अक्षय कुमारची जागा घेता येणार नाही!

  • by

नमस्कार मित्रांनो.

बॉलिवूडमधील “हेरा फेरी” आणि ‘फिर हेरा फेरी’ या दोन्ही कॉमेडी चित्रपटांच्या दमदार कामगिरीनंतर, इतक्या वर्षांनी त्याचा तिसरा भाग बनवण्याच्या चर्चा सध्या जोरात रंगत आहेत. तसेच या दोन्ही सुपरहिट चित्रपटातील अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांचा पडद्यावर दाखवलेला अप्रतिम अभिनय आजही प्रेक्षकच्या मनात जागा करून आहेत.

पण अलीकडेच ‘हेरा फेरी 3 ‘मध्ये कार्तिक आर्यन राजूच्या भूमिकेत दिसणार असल्याची बातमी आली, ज्यामुळे अक्षय कुमारच्या चाहत्यांना धक्काच बसला, मात्र यावर काही दिवसांपूर्वी सुनील शिट्टीनी मोन सोडले. चला तर बघूया काय आहे प्रकरण..

तर “हेरा फेरी 3” मध्ये अक्षय कुमार दिसणार नाही, ही बातमी समजताच अनेक चाहत्यांची मनं तुटली होती. अशा परिस्थितीत सुनील शेट्टी या विषयावर उघडपणे पुढे आले आणि अक्षय कुमारची जागा घेऊ शकत नाही, असे सांगितले त्यामुळे अनेक लोकांना सुखद धक्का बसला.

दरम्यान, हेरा फेरीचे नाव ऐकताच जवळजवळ सर्व लोकांना अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाचा चेहरा समोर येतो. दरम्यान, या हेरा फेरी चित्रपटाचा तिसरा भाग सध्या खूप चर्चेत आहे. अक्षय कुमार हेअरी फेरी 3 मध्ये न दिसल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या तिसऱ्या भागांत काही क्रिएटिव्ह मतभेदांमुळे अक्षय कुमार नसल्याचे सांगितले जात होते.

मात्र, त्याचबरोबर सुनील शेट्टीही या मुद्द्यावर उघडपणे बोलले आहेत. हेरा फेरी 3 साठी अक्षय सर्वात योग्य असल्याचे सुनील शेट्टीला वाटते. कारण सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल या त्रिकुटाचा चित्रपट इतका हिट होता की आजपर्यंत लोक विसरलेले नाहीत.

दरम्यान, हेरा फेरी 3 बद्दल बोलताना सुनील शेट्टी म्हणाले की, अक्षय कुमार चित्रपट करण्यासाठी तयार होता. पण नंतर अचानक बातमी आली की, तो चित्रपट करत नाहीये. मला निर्मात्यासोबत बसण्याची संधी मिळाली नाही. सुनील शेट्टी म्हणाले की, त्यांना फक्त हे माहित आहे की, हेरा फेरी 3 बनत आहे. फिरोज नाडियादवाला त्याला या चित्रपटाबद्दल सांगतील.

काही दिवसापूर्वी हा वाद तेव्हा निर्माण झाला जेव्हा परेश रावल यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून सांगितले की, कार्तिक आर्यन हेरा फेरी 3 मध्ये दिसणार आहे. दरम्यान, अक्षय कुमारला हेरा फेरी 3 ची स्क्रिप्ट फारशी आवडली नाही, त्यामुळे त्याने हा चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी, असेही बोलले जात आहे की, अक्षयची फी जास्त होती, त्यामुळे कार्तिकला रोल ददेण्यात आला होता.

मात्र, दुसरीकडे अभिनेता अक्षय कुमार व्यतिरिक्त प्रेक्षकांना राजूच्या भूमिकेत कोणाला बघायचे नाही. अक्षय कुमारने स्वत: या चित्रपटातून बाहेर पडल्याचे पुन्हा स्पष्ट केले होते. कार्तिकच्या एंट्रीने खळबळ उडाली असतानाच आता सुनील शेट्टीने अक्षयला चित्रपटात परत घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *