Skip to content

हे ७ संकेत सांगतात की देव दररोज तुमच्या घरी येता. असे लक्षणे दिसले तर समजून जा लवकरच श्रीमंत होणार.

  • by

नमस्कार मित्रांनो.

आपल्या प्रत्येकाची कोणत्या ना कोणत्या देवतेवर देवावर श्रद्धा असते. आपण त्या देवतेची दररोज मनोभावे पूजा करतो साधना करतो. आणि कधीकधी ही साधना फलास येते आणि ही देवता आपल्या घरात वास करू लागते. ही देवता जेव्हा प्रसन्न होते आणि आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये जेव्हा ती वास करू लागते अर्थातच हा वास अदृश्य स्वरूपात असतो. 

ही देवता आपल्याला दिसू शकत नाही मात्र या देवतेकडून काही संकेत मात्र आपल्याला प्राप्त होतात. असे सात संकेत आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो जर तुम्हाला पहाटे म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावर शरीरामध्ये कंपन जाणवत असतील शरीर जर सूक्ष्मरित्या थरथरत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे. 

ते आपल्या वास्तूमध्ये वास्तव्य करत आहेत. आणि त्यांच्या कृपेने सर्वकाही चांगलं शुभ आणि मंगलच होणार आहे. अशाच प्रकारची कंपन ही संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्ता समय सुद्धा जाणवतात दोन वेळा आहेत एक तर ब्रह्म मुहूर्त आणि दुसरी वेळ म्हणजे सायंकाळ जेव्हा सूर्य मावळू लागतो. या दोन वेळेला जर तुमच्या शरीरात कंपन तुम्हाला जाणवत असतील. 

शरीर सूक्ष्मरित्या जर थरथरत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे देवी देवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा. अनेकदा आपल्याला भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनांची एक जाणीव होते. की आता ही गोष्ट नक्की घडणारच आहे. आता अस असं होणार आहे असा अंदाज अनेक जणांना येऊ लागतो. आणि हा अंदाज खरा सुद्धा ठरतो. 

जर तुमच्याही बाबतीत तुम्हाला भविष्यातील घटनांचा अंदाज वर्तवता येत असेल भविष्यात कोणत्या घटना घडणार आहेत हे जर तुम्ही सांगू शकत असाल. तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांच्या कृपेने तुम्हालाच ही एक दैवी शक्ती प्रदान केलेली आहे. अजून एक फार मोठा संकेत तो म्हणजे कुटुंबावर आपल्या घरावर कितीही मोठा संकट येऊ द्या. अगदी कोणतीही विपत्ती येऊ द्या. 

अशा संकट समई जर तुमची तुमच्या देवतेवरची देवावरची श्रद्धा ढळत नसेल तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता तो विश्वास जर कमी होत नसेल. तो विश्वास तर अगाज राहत असेल. तर हा सुद्धा एक खूप मोठा संकेत असतो की ही बुद्धी तुम्हाला त्या देवानेच दिलेली आहे की त्या देवाचा वास तुमच्या घरात होतो आहे. आपल्या कुटुंबात जे सदस्य असतील जे लोक असतात. 

त्यांच्यातील भांडण संपून जर प्रेम वाढीस लागले असेल. घरातील प्रत्येक सदस्य एकमेकांशी प्रेम भावनेने जर वागत असेल तर हा सुद्धा संकेत असतो की देवी देवता आपल्या घरात वास करत आहेत. अनेक जणांना स्वप्नामध्ये लहानशा मुलीचं वारंवार दर्शन होत. एक छोटीशी सुंदर अशी मुलगी जणूकाही प्रत्यक्ष महालक्ष्मी माता लक्ष्मी अशी छोटीशी मुलगी दिसते. 

निरागस मुलगी तर अशा मुलीचं वारंवार तुम्हाला स्वप्नामध्ये दर्शन होत असेल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांची कृपा तुमच्यावरती होते आहे. आपल्या घरामध्ये आपल्या अंगणामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होणे फुले वगैरे नाहीयेत किंवा फुले आहेत. मात्र किती तितकीशी सुगंधी नाहीत.

मात्र जर तुम्हाला एक प्रकारचा मनमोहक मनाला मोहून टाकणारा सुगंध तुमच्या घरामध्ये तुमच्या घराच्या आसपास जर जाणवत असेल तर हा सुद्धा संकेत असतो देवी-देवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा. आणि एक शेवटचा संकेत तो म्हणजे आपल्या स्वयंपाक घरामध्ये गृहलक्ष्मी म्हणजे घरातली स्त्री जे काही बनवेल काहीही बनवू द्या जर ते स्वादिष्ट बनत असेल चविष्ट चवदार बनत असेल. 

तर माता अन्नपूर्णा प्रसन्न आहे हे समजून जा आणि घरामध्ये देवी देवतांचा वास नक्की आहे. अशावेळी उतू नका मातू नका आणि या देवी देवतांना अजून कस प्रसन्न करवता येईल त्यांची कृपा कशी प्राप्त करता येईल. यासाठी सद्वर्तन करा दानधर्म करा पूजा पाठ करा. आणि आपल्या धर्म संस्कृतीला कधीच विसरू नका. धन्यवाद ओम नमो नारायणा. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *