Skip to content

१२ राशींसाठी कसा असेल जुलै २०२३. या घटना जुलै मध्ये तुमच्या आयुष्यात घडणार म्हणजे घडणारच.

नमस्कार मित्रांनो.

जुलै २०२३ सुरू झाला आहे. आता हा जुलै महिना तुमच्यासाठी कसा जाणार आहे. चला जाणून घेऊया. मित्रांनो जुलै महिन्यामध्ये चार ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. आता जेव्हा जेव्हा राशी परिवर्तन ग्रह करतात. तेव्हा त्याचा परिणाम सर्वच राशींवर होत असतो.

पण कोणासाठी ते लाभाचे ठरत तर कोणाचे नुकसान करणारे ठरते किंवा कोणाला काळजी घ्यायला सांगितल जात तर तेच आपण बघणार आहोत की आता जुलै महिन्यामध्ये कोणत्या राशींना लाभ होणार आहे कोणत्या राशींनी काळजी घ्यायची आहे किंवा कोणत्या राशीच नुकसान होणार आहे तर चला जाणून घेऊयात.

१) मेष रास- मेष राशीचक्रातील पहिली रास आहे आणि या लोकांची आर्थिक स्थिती जुलै महिन्यात चांगली राहील. या काळात उद्योगधंद्यात भरभराट दिसून येईल. घरातील वातावरण सुद्धा चांगल असेल. तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. काही लोकांना आरोग्यविषयक तक्रारी भेडसावू शकतील. आर्थिक व्यवहार करताना काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल. संपूर्ण महिन्यात तुमचा तुम्ही विश्वास मात्र दुणावलेला असेल.

२) वृषभ रास – कौटुंबिक कलहामुळे मन तुमच जरा अस्वस्थ होईल. जोडीदारासोबत काही कारणास्तव वाद होऊ शकतात. आर्थिक स्थिती खालावलेली असल्याने अडचणींचा डोंगर उभा राहील. कोणतेही काम हाती घेण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. शुक्राची स्थिती चांगली असल्याने समाजात मानसन्मान मिळेल. पण वाद होतील असे वागू नका.

३) मिथुन रास- महिन्याची सुरुवात काही अडचणींनी होईल. पैशांची जुळवाजुवळ करताना चांगलीच दमछाक होईल. पण महिन्याच्या मध्यात हळूहळू थोडी गाडी रुळावर येईल. नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. तसेच जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो.

४) कर्क रास- गेल्या काही दिवसापासून नोकरीत बदल करण्याचा कर्क राशीची लोक विचार करत असतील तर त्यांना या काळात चांगल्या ऑफर मिळू शकतील. पण या महिन्यात खर्चावर नियंत्रण तुम्हाला ठेवाव लागेल.महिन्याच्या शेवटी आर्थिक कोंडी होऊ शकते. त्यामुळे पैसे वापरताना काळजी घ्या.बचत करा. आरोग्याच्या तक्रारी थोड फार डोक वर काढतील.त्यामुळे आरोग्याची सुद्धा काळजी घ्या.

५) सिंह रास- या राशींच्या लोकांना हा महिना उत्साहदारी जाणार आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल. नोकरी धंद्यात त्यांना अपेक्षित यश मिळेल. कुटुंबातील काही व्यक्तींसोबत मात्र वाद होऊ शकतात. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. विदेश वारी करण्याचा विचारत असाल तर या महिन्यात ग्रहमान अनुकूल आहे.

६) कन्या रास- कौटुंबिक वादामुळे जीव नकोसा होऊ शकतो. धरलं तर चावतंय आणि सोडल तर पळतंय अशी स्थिती निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे कोणत्याही वादापासून तुम्ही लांबच राहा. आर्थिक स्थितीची काळजी नसावी ती व्यवस्थित असेल. जमवलेले पैसे खर्च होणार नाहीत. त्याची काळजी मात्र काळजी घ्या.

७) तुळ रास- या राशींच्या लोकांना जुलै महिन्यात जर असा संमिश्र जाईल. विद्यार्थ्यांसाठी महिना चांगला असेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश सुद्धा मिळू शकतो. छोट्या मोठ्या प्रवासाचे योग जुळून येतील. घरातील वातावरण निश्चितच चांगले राहील. अचानकपणे धनलाभ तुम्हाला या काळात होऊ शकतो.

८) वृश्चिक रास- घरातील वडीलधारांची काळजी घ्या. आरोग्यविषयक तक्रारी त्यांच्या या काळात डोकवर काढू शकतात. मंगळ धनस्थानात असल्यामुळे आर्थिक स्थिती निश्चितच चांगली राहील. या महिन्यात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. घर व जमीन खरेदीसाठी उत्तम काळ आहे. कौटुंबिक वातावरण चांगले असेल.

९) धनु रास- या महिन्यात अडकलेले काम पूर्ण होताना दिसेल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. कला क्षेत्रात यश मिळेल.नोकरी करणाऱ्या जातकांना काही त्रास मात्र सहन करावा लागेल. बॉस कडून कामाचा काही अतिरिक्त ताण जाणवेल. वेळ कमी पडतोय अस वाटत राहील आणि त्याने चिडचिड वाढेल. धनलाभ आणि पदोन्नती शक्यता मात्र आहे.

१०) मकर रास- कौटुंबिक वातावरण चांगले राहील. या महिन्यात अध्यात्माकडे तुमची ओढ वाढेल. तीर्थयात्रा तुम्हाला या महिन्यात घडू शकतात. विदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तशी संधी मिळेल. व्यवसायात यश मिळेल. जोडीदाराची उत्तम साथ तुम्हाला लाभेल. त्यामुळे काही किचकट कामे सुद्धा झटपट पूर्ण होतील.

११) कुंभ रास- करिअरमध्ये काही चढ-उतार पाहायला मिळतील. नव्या योजना वर लक्षपूर्वक काम करावे लागेल. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. धनहानी होण्याची या काळात शक्यता आहे त्यामुळे कोणताही निर्णय घेताना दहा वेळा विचार करा. या महिन्यात रागावर नियंत्रण ठेवणेही गरजेचे आहे.काही गोष्टी आपल्या हातात नसतात हे लक्षात ठेवा. त्यामुळे विचार करून गुंतवणूक करा. योग्य व्यक्तींचा तज्ञांचा सल्ला घ्या. आरोग्य विषयी तक्रारी तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे आरोग्याची ही काळजी घ्या.

१२) मीन रास- आरोग्यविषयक तक्रारीचा डोंगर मीन राशीच्या लोकांना सुद्धा त्रास देईल. मधुमेह असणाऱ्या जातकांनी विशेष काळजी घ्यावी.आहारावर नियंत्रण ठेवावे. व्यापाऱ्यांना हा महिना चांगला जाईल. अनपेक्षित व्यवहार लाभ देऊ शकतात. आई-वडिलांकडून चांगली आर्थिक मदत मिळेल. कौटुंबिक वातावरणही चांगले राहील. समाजात काही कारणास्तव छबी खराब होण्याची प्रसंग होतील. संयमाने सामोरे गेला तर सर्व काही ठीक होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *