Skip to content

१७ जुलै २०२३ आषाढ अमावस्या “या “उपायांनी चमकेल नशीब..!

नमस्कार मित्रांनो.

१७ जुलैला आहे दीप अमावस्या अर्थात दिव्यांची आवस आषाढ अमावस्या ही अमावस्या खूप खास असते . या दिवशी काही खास उपाय वास्तुशास्त्राप्रमाणे ज्योतिषशास्त्राप्रमाणे केले जातात. त्यामुळे काय होते तर आपल्या घरामध्ये आर्थिक संकट दूर होते. घर धनधान्याने भरून जाते घरात सुख-समृद्धी येते. पण त्यासाठी काय करायचे कसे करायचे कधी करायचे चला जाणून घेऊयात.

मंडळी आषाढ महिन्यात येणाऱ्या दीप अमावस्येला विशेष महत्त्व आहे यामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पितृ तर पण करण्याची ही परंपरा आहे त्यामुळे पितरांना शांती मिळते. पितर तृप्त होतात आणि पितरांचा आशीर्वाद आपल्याला देतात. जीवनातील प्रगतीची द्वारे त्यामुळे खुली होतात त्याचबरोबर आषाढ अमावस्येला काही उपाय सुद्धा केले जातात जे धन आणि सौभाग्य वाढवण्यास अत्यंत उपयुक्त मानले जातात. चला तर मग अशाच काही उपायांबद्दल आपण जाणून घेऊयात.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला अडचणी केव्हा येतात जेव्हा ग्रहदोष असतो पत्रिकेमध्ये कुठलातरी ग्रह कुठल्यातरी कुठल्यातरी चुकीच्या ठिकाणी बसलेला असतो किंवा चुकीची फळ देत असतो. आणि त्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये अडचणी जाणवू लागतात नोकरी लागत नाही विवाह जुळत नाहीत किंवा शिक्षण पूर्ण होण्यात अडथळे येतात.

आणि मग अशा समस्यांपासून मुक्ती मिळवायचे असेल तर दीप अमावस्येला पिंपळाची झाडाची पूजा करून वृक्षारोपण केल्याने ग्रहदोष दूर होतात. या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाला दूध आणि तूप आणि पाणी अर्पण करावे आणि त्यानंतर पाच प्रकारच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा धूप दीप लावून पूजा करावी हे केल्याने पितृदोष दूर होतो आणि ग्रहदोषामुळे येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतात

या दिवशी तुम्ही तुळस, वड, अशोक अशी झाडे लावू शकता अर्थात वृक्षारोपण करणे सुद्धा फलदायी ठरू शकते. त्याच प्रकारे जर तुमच्या पत्रिकेमध्ये कालसर्प दोष आहे तर त्याची पूजा करावी लागेल असं जर तुम्हाला सांगितलेला असेल, आणि ती पूजा करणे तुम्हाला सध्या तरी शक्य नसेल तर दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून ध्यान करून कालसर्प दोष दूर करण्यासाठी भगवान शंकरांची पूजा करा. पंचामृताने शिवलिंगाला अभिषेक घाला.

त्यानंतर चांदीच्या नागाची ही पूजा करा आणि त्यानंतर पांढऱ्या फुलांनी तो वाहत्या पाण्यामध्ये अर्पित करा असे केल्याने कालसर्प दोष दूर होऊन भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आता आणखीन एक उपाय घरामध्ये सुख-समृद्धी यावी धन धान्याने घर कायम भरलेल असाव यासाठी आषाढ अमावस्येला पितरांच्या शांतीसाठी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून तर पण करावेच पण त्याचबरोबर पितृसूक्त, गरुड पुराण,पितृ गायत्री पाठ, पितृदेव चालीसा याप्रमाणे स्तोत्र व ग्रंथ वाचावेत.

आरती करावी आणि नंतर गरीब आणि गरजू व्यक्तीला अन्नदान करावे. दक्षिणा द्यावी असे केल्याने देखील आपल्या जीवनात अन्नधान्याची कमतरता कधीच भासत नाही. आता धन लावा साठी कोणता उपाय करायचा आहे ते पाहुयात . तुमची आर्थिक परिस्थिती सुधारावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर दीप अमावस्येच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात लाल रंगाच्या धाग्याने ज्योत बनवून गाईच्या तुपाचा दिवा लावावा.

लक्षात घ्या ती वात कापसाची नसावी दिव्यात थोडेसे केशर घाला. त्यानंतर कनकधारा स्तोत्राचे पठण करा. रात्री वाहत्या पाण्यामध्ये पाच फुले आणि पाच दिवे प्रवाहित करा. असे केल्याने महालक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि धनलाभाचे योग जुळून येतात. त्याचबरोबर भाग्याची साथ हवी असेल तर, दीप अमावस्येला अर्थात आषाढ अमावस्येला रात्री देवघरांमध्ये महालक्ष्मी यंत्र ठेवून यंत्राची विधिवत पूजा करावी.

त्यामुळे कुटुंबात सुख शांती येते तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्राची पूजा सुद्धा तुम्ही अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी नक्की करा. तसेच या दिवशी मुंग्यांना कोरडे पीठ मिसळून साखर खाऊ घाला. असे केल्याने सुद्धा सर्व त्रास दूर होतात आणि भाग्य साथ देऊ लागते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *