Skip to content

१८ जानेवारीपासून या ५ राशींवर लक्ष्मीनारायण कृपा, आता नारायण करतील या राशींच्या सर्व इच्छा पूर्ण.

नमस्कार मित्रांनो.

मंडळी १८ जानेवारीपासून या ५ राशींवर लक्ष्मीनारायणाची कृपा होणार आहे. त्या पाच राशींपैकी पहिली रास आहे मेष रास, दुसरी रास आहे सिंहा रास, तिसरी रास आहे कन्या रास, चौथी रास आहे तुळ रास आणि पाचवी रास आहे कुंभ रास या पाच राशींवर लक्ष्मीनारायणाची कृपा १८ जानेवारीपासून होणार आहे. पण १८ जानेवारीला विशेष काय घडणार आहे आणि याच ५ राशींवर कृपा होणार आहे का? बाकीच्या राशींच काय बाकीच्या राशींना काही लाभ होणार आहे की नाही चला जाणून घेऊया.

मंडळी नवग्रह आहेत हे नवग्रह ठराविक काळाने गोचर करतात. गोचर करतात म्हणजेच काय तर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. याच भ्रमणाचा याच गोचाराचा याच राशी परिवर्तनाचा लाभ राशींना होत असतो. आपल्या आयुष्यामध्ये होणारे चढ-उतार याच गोचरामुळे होत असतात. ग्रहांच्या युतीमुळे अनेक वेगवेगळे योगही तयार होत असतात. जस आता शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण योग १८ जानेवारीपासून तयार होतोय. आणि याचाच लाभ काही राशींना होणार आहे.

१) मेष रास – मेष राशीच्या लोकांना शुक्राचा हे संक्रमण अतिशय अनुकूल परिणाम देणारा असणार आहे. तसं तर मेष राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असतो की ते जे करायचंय ते करूनच राहतात. डोक्याने थोडे जरी तापट असले तरी सुद्धा आपल्या ध्येयाप्रती हे अत्यंत एकाग्र असतात. आपलं ध्येय साध्य होईपर्यंत ते अजिबात इकडे तिकडे पाहत नाहीत आणि हीच गोष्ट त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन जाते. आणि यंदा सुद्धा हेच होणार आहे. तुमच हेच लक्ष देऊन काम करण एखाद्या गोष्टीवर एका ग्रहण तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला अचानक मोठ यश मिळवून देणार आहे. तुमच्यासाठी पैशाच्या प्रवाहाचे नवीन मार्ग सुद्धा खुले होतील.

कठोर परिश्रम करायला तुम्ही घाबरत नाही प्रामाणिकपणे प्रयत्न करतात आणि याच गोष्टीमुळे तुम्हाला हमखास यशही मिळत ते आताही मिळणार आहे. तुमची कमाई वाढेल तुम्हाला प्रेम जीवनामध्ये सुद्धा आनंद मिळेल कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल. रागावर नियंत्रण मात्र मेष राशीच्या लोकांनी करायचय. यावेळी तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात कोणतेही निर्णय घ्याल तर ते निर्णय तुम्हाला लाभच करून देतील. नशीब तुमच्या बाजूने आहे अस म्हणायला हरकत नाही.

फक्त एक गोष्ट मेष राशीच्या लोकांनी करायचे आहे ती म्हणजे रागावर नियंत्रण कारण रागामध्ये तुम्ही लोक तोंडाला येईल ते बोलून जातात त्यामुळे समोरच्याच्या मनाला घर पडतात. समोरच्याचा मन दुखावले जातात मग तुमच्याबद्दल समोरच्याला कितीही आपुलकी वाटत असेल तरी तुम्ही तुमच्या तोंडाने तुमच्या वाणीने त्या व्यक्तीला स्वतःपासून दूर करतात. म्हणून बोलण्यामध्ये संयम बाळगायचा आहे.

२) सिंह रास – सिंह राशीचे लोक बोलायला अत्यंत स्पष्ट असतात. जे मनात येईल ते स्पष्टपणे बोलून जातात. स्पष्ट बोलणं आणि प्रामाणिकपणा यामुळे सुद्धा या व्यक्ती यशाची नवनवीन शिखर गाठत असतात. सिंह राशीच्या लोकांना शुक्राच्या संक्रमणामुळे करिअरमध्ये उत्तम संधी मिळतील. नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला अचानक पैसे मिळतील. आणि तुमची नवीन ओळख निर्माण होईल.

तुम्हाला ऑफिसमध्ये सगळ्यांचं प्रेम पाठिंबा सहकार्य मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. करिअरच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभ परिणाम देणारा ठरेल. तुमच्यासाठी नवीन नोकरीची ऑफर देखील येऊ शकते. या काळात तुम्ही कोणतीही मुलाखत द्यायला गेलात तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुमचे संबंध पूर्वीपेक्षाही अधिक रोमँटिक होतील आणि तुम्हाला आर्थिक बळ मिळेल.

३) कन्या रास – कन्या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण जीवनात सुख समृद्धी घेऊन येणार असेल. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर या संक्रमणाच्या प्रभावामुळे तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. तुमच्या करिअरमध्ये मोठी जे तुम्ही घेऊ शकतात. तुम्हाला इच्छित असलेलं स्थान प्राप्त करण्याचा हा अत्यंत योग्य काळ आहे. अभ्यास पूर्ण केल्यानंतर नोकरी शोधत असलेल्यांसाठी हे संक्रमण अनुकूल परिणाम देणार ठरेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जवळीक वाढेल आणि तुमच्या जोडीदारासोबतच तुमचं नातं अधिक घट्ट होईल.

कन्या राशीचे लोक तसं तर प्रचंड हिशोबी आणि व्यवहारी असतात. कुठलाही गोष्टीकडे अगदी व्यवहारी नजरेने बघतात. पण कधी कधी त्यांनी समोरच्यांच्या भावनांचा विचार करणे ही गरजेच असत.खास करून नात्यामध्ये नात्यांमध्ये व्यवहारी किंवा हिशोबी विचार करून चालत नाही तिथे थोडासा तरी हृदय आणि विचार करावा लागतो. तुमचे व्यवहार कुशलता तुम्हाला खूप मदत करते आणि प्रगतीच्या पथावर घेऊन जाते यात शंकाच नाही. पण व्यवहार कुठे दाखवायचा हे मात्र तुम्ही ठरवायला हव.

४) तूळ रास – तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि शुक्राचा संक्रमण होत आहे त्यामुळे तूळ राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळणार यात शंकाच नाही. तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढेल. तुमच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये किंवा लव लाइफ मध्ये तुम्ही यावेळी जे काही निर्णय घ्याल त्याचा तुम्हाला भविष्यात फायदाच होईल. जर तुम्हाला भागीदारीत व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ तुम्हाला शुभ परिणाम देईल.

तुम्हाला यश मिळेल कुटुंबातील भाऊ बहिणी सोबत तुमचे संबंध दृढ होतील आणि तुमचा आरोग्य देखील सुधारेल. तूळ राशीचे लोक सगळ्या गोष्टींमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करतात. मग ते नातं असो किंवा प्रोफेशनल लाईफ असो संतुलित जीवन जगण्यामध्ये यांचा कल असतो. तूळ राशिच्या लोकांमध्ये अनेक कला गुण असतात. फक्त त्या कलागुणांवर प्रोफेशनल काम करण्याची गरज असते. तर त्या कलागुणांमधून तुमचे उत्पन्नही वाढू शकत.

५) कुंभ रास – कुंभ राशीची लोक ही अभ्यासू असतात. म्हणजे शाळा कॉलेजमध्ये भरपूर अभ्यास करतात असं नाही. तर ज्या कुठल्या गोष्टी मध्ये त्यांना इंटरेस्ट आहे त्या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतात. जरी कधी कधी शाळा कॉलेजमध्ये कुंभ राशीची मुलं मुली हे अभ्यासू नाही येत असं वाटलं तरी सुद्धा त्यांना इंटरेस्ट असलेल्या गोष्टींमध्ये मात्र ते प्राविण्य मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना हवे असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी अथक परिश्रम करतात. कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण आपार यश मिळवून देईल.

तुमच्या भौतिक सुख सोयीमध्ये वाढ होईल आणि अचानक अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुम्ही आता कोणत्याही प्रकल्पात पैसे गुंतवले तरी तुम्हाला भविष्यात त्याचा उत्कृष्ट परतावा मिळेल. कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला यश आणि लाभ होईल. दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली काही काम सुद्धा यशस्वी झाल्याचा अनुभव तुम्हाला या काळात येईल त्यामुळे तुमचा उत्साह देखील वाढेल. करिअरमध्ये ही तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याचा हा काळ आहे.

मंडळी हे झाल या पाच राशींबद्दल पण बाकीच्या राशींचा काय शुक्र संक्रमणाचा त्यांना काहीच लाभ होणार नाहीये का तर मंडळी तसं नाही प्रत्येक ग्रहाची उपासना केल्यावर तो ग्रह लाभ देतो. तुम्हाला जर शुक्र ग्रहाची कृपा व्हावी अर्थात शुक्राच्या कृपेने ऐश्वर्य सुख-समृद्धी प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही माता महालक्ष्मीची सेवा पूजा किंवा तिचा स्तोत्र पठण मंत्र पठण करा. त्यामुळे शुक्र ग्रह चांगला होतो.

शुक्र ग्रहाची फळ मिळायला लागतात शुक्र ग्रहाची फळ म्हणजे काय आपल्या सुख-सोहींमध्ये वाढ होते. ऐश्वर्या मध्ये वाढ होते उत्पन्न वाढत अशा सगळ्या प्रकारच्या भौतिक गोष्टी शुक्र ग्रह देतो. म्हणूनच शुक्र ग्रहाला प्रसन्न करायचा असेल तर दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा आवश्यक करावी किंवा माता महालक्ष्मी साठी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करावा. त्यामुळे शुक्र ग्रहाची सुद्धा शुभ फळ मिळायला सुरुवात होते आणि माता महालक्ष्मीची सुद्धा कृपा होते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *