Skip to content

२ जुलैपर्यंत या राशींसाठी लक्ष्मीनारायण योग. अचानक चमकून उठेल या राशींचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांचा वर्णन करून अनेक वेगवेगळ्या शास्त्रांच वर्णन करण्यात आला आहे. त्यात काही योग अत्यंत शुभ असतात तर काही योग अत्यंत अशुभ असतात. आता योग शुभ की अशुभ हे राशींवरच्या झालेल्या परिणामामुळे ठरतं.

शुभयोगात पैकी एक म्हणजे लक्ष्मीनारायण योग. आता याच्या नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा अत्यंत शुभयोग आहे.या योगाच्या निर्मितीमुळे व्यक्तीवर लक्ष्मीनारायणाची कृपा होते. ज्योतिष शास्त्रात असे सांगितले गेले आहे की लक्ष्मीनारायण नावाचा योग हा एक अत्यंत दुर्मिळ योग आहे.

जो बुध आणि शुक्र एकाच राशीत आल्यानंतर तयार होतो. या महिन्यात १८ जून रोजी शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल. शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी आहे त्यामुळे इथे आल्यामुळे तो बलवान होईल. त्यातच आणखीन भर म्हणून आणिक एक योगायोग घडला आहे तो म्हणजे दूध सुद्धा याच राशीत विराजमान आहे.

 १८ तारखेला जेव्हा शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल, तेव्हा तिथे लक्ष्मीनारायण योग तयार होईल. हा लक्ष्मीनारायण योग अनेक राशीसाठी शुभ असेल परंतु मुख्य दोन राशी आहेत ज्यांना याचा खूप फायदा होईल. कोणत्या आहेत त्या दोन राशी चला जाणून घेऊ या.

मंडळी हा योग २ जुलै पर्यंत असणार आहे. आणि दोन जुलै पर्यंत ह्या दोन राशींना याचा भरपूर फायदा होणार आहे. या योगाची माहिती अशी आहे की जेव्हा हा योग तुमच्या राशीमध्ये तयार होतो तेव्हा गरिबातील गरीब व्यक्ती सुद्धा आर्थिक अडचणी सुटते नका मिळवते पैसा कमावते. अनेक नव्या संधी त्या व्यक्तीला सुद्धा मिळतात. आणि अर्थात आताही शुभ संधी वृषभ राशीच्या लोकांना उपलब्ध होणार आहे.

याच राशीत हा योग तयार होत आहे त्यामुळे या राशीसाठी हा लक्ष्मीनारायण योग अर्थातच शुभ आहे. वृषभ राशीच्या लोकांना 18 जून ते 2 जुलै पर्यंत आर्थिक प्रगतीच्या उत्तम संधी मिळतील. या राशीच्या व्यवसायिकांना यावेळी त्यांचा व्यवसाय पुढे नेण्यात यश मिळेल. 

जिथून आशाही नव्हती तिथून त्यांना अचानक लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना या वेळी आनंदाची बातमी सुधा मीळू शकते. नवीन नोकरी सुद्धा मिळू शकते. या काळात या राशीच्या लोकांच्या बुद्धिमत्तेतही आणखीन वाढ होईल. त्यांच्या बुद्धिमत्तेचा कस लागेल. त्याची कदर केली जाईल.

याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ज्या क्षेत्रामध्ये तुम्हालाही यश मिळेल. वृषभ राशीचे लोक या काळात भौतिक सुखाचा आनंद घेतिल. त्यांचं मन कुटुंबातही रमेल. आणि कुटुंबामध्ये आनंद राहील.

त्यानंतरची दुसरी रास आहे वृश्चिक रास- वृश्चिक राशि साठी सुद्धा लक्ष्मीनारायण योगाचे फायदे आहेत. वृश्चिक राशीच्या लोकांना ही लक्ष्मीनारायण योगामुळे बराच फायदा होईल. ह्या काळात त्यांचे कौटुंबिक जीवन खूप आनंदी होणार आहे. त्यांना जोडीदाराच्या सहवासातून लाभ मिळेल.

त्यांच्या जोडीदाराला सुद्धा लाभाची नवीन संधी मिळेल. वृश्चिक राशीच्या लोकांना भागीदारी व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. कामाच्या ठिकाणी सहकार्य आणि त्यांचे अधिकारी यांचे सहकार्य मिळेल. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना या शुभयोगात त्यांच्या प्रयत्नात यश मिळेल.

स्पर्धा परीक्षेच्या निकालाची वाट पाहणाऱ्यांना सुद्धा चांगली बातमी मिळू शकते. तर मंडळी लक्ष्मीनारायण योगाचा फायदा वृषभ आणि वृश्चिक या दोन्ही राशींना होणार आहे. त्यांचे वाईट दिवस आता बदलणार आहेत त्यांच्या आयुष्यात आनंदाला बहार येणार आहे अस म्हणायला हरकत नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *