Skip to content

३० मे २०२२ अद्भूत सोमवती अमावस्या या ६ राशी पैसे मोजता मोजता थकतील.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. सोमवारी येणार्‍या अमावास्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात. सोमवती अमावस्याच हे व्रत करवा चौथ सारखच फलदायी मानला जात. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी व्रत करतात. या वर्षी सोमवती अमावस्या ३० मे २०२२ ला आहे. विशेष म्हणजे ही वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या आहे. 

सोमवती अमावस्याची तिथ सुरू होईल. २९ मे ला दुपारी दोन वाजून १५ मिनिटांनी आणि अमावस्या तिथ समाप्त होईल. ३० मेला दुपारी ४:५९ मिनिटांनी धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्याला विशेष महत्त्व आहे. या पवित्र दिवशी पितरांना तर्पण अर्पण केल्याने त्यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. आणि जीवनात सुखसमृद्धी आणि धन धान्याची प्राप्ती होते. 

या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. त्या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. सोमवती अमावस्या आणि शनि जयंती एकत्र आहे. अशा स्थितीत या दिवशी महा योग तयार होत आहे. जयंतीच्या दिवशी काही उपाय केल्याने देवाची कृपा प्राप्त होऊ शकते. या वेळी हा दिवस सोमवारी ३० मेला आहे. 

शनिदेवाला न्यायाची देवता असेही म्हणतात. शनिदेव हे सूर्यदेव आणि माता छाया यांचे पुत्र आहेत. पिता आणि पुत्र असे नाते संबंध असले तरी दोघांमध्येही वैर आहे. शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे आणि या वेळेस अमावस्या सोमवारी आली आहे. ही अमावस्या वर्षातील शेवटची अमावस्या आहे. आणि या दिवशी शनी जयंती आहे. 

शनी जयंतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे दान करा. काळी छत्री स्टीलची भांडी शूज चप्पल हे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. जयंतीच्या दिवशी पिंपळाला मोहरी तेलाचा दिवा लावावा. जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होईल. आणि जयंतीच्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण कराव.

या पाण्यामध्ये गूळ आणि तांदूळ टाकावे. अमावस्याच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे. पवित्र नदीत स्नान करणे शक्य नसल्यास घरातील आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाका. शनी जयंतीच्या दिवशी गरिबांना अन्नदान करा आणि गरजूंना मदत करा. आता पाहूया सोमवती अमावस्या दिवशी कोणत्या राशींचे भाग्य चमकणार आहे. 

मेष राशी- सोमवती अमावास्येला मेष राशीचे भाग्य चमकून उठणार आहे. जीवनातील समस्या आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. मानसिक ताण तणावातून तुम्ही मुक्त होणार आहात. आर्थिक अडचणी आता दूर होतील कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे.

भाग्य आपल्याला भरपूर साथ देणार आहे. प्रत्येक कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. 

कर्क रास- कर्क राशिवर आमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव पडणार आहे. शुभ कार्यात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक  समाधानकारक असेल. परिस्थीती आर्थिकदृष्ट्या मजबूत बनणार आहे.  वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.

कन्या रास- कन्या राशि वर सोमवती अमावस्याचा खूप शुभ प्रभाव पडणार असून जीवनातील दुःख दारिद्र्य संपणार आहे. आणि आर्थिक क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. प्रगतीच्या नव्या संधी आपल्याकडे चालून येणार आहेत. 

मानसिक तान तनाव भीतीचं दडपण दूर होऊन आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. नोकरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होईल.

तूळ रास- तूळ राशिवर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. जीवनात चालू असणारी संघर्षाची स्थिती आता बदलणार आहे. चांगले योग जमून येतील. कार्यक्षेत्रातून नफा होणार आहे. घर परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. उद्योग-व्यापार कार्यक्षेत्र समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

मकर रास- सोमवती अमावस्याचा शुभ प्रभाव दिसेल. धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. आपला अडकलेला पैसा परत प्राप्त होईल. मानसिक तानतनाव दूर होईल. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न झाल्यावर प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून तुम्ही दाखवणार आहात. 

मीन राशी- मीन राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. अमावस्येपासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरेल. तसेच याच्या सकारात्मक प्रभाव मुळे चमकुन उठेल. आपले भाग्य आता प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या उत्पन्न आणि कामांमध्ये वाढ होणार आहे. घर परिवार मध्ये असणारी नकारात्मक परिस्थितीत दूर होऊन शुभकार्याची सुरुवात होईल. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *