चालू घडामोडी

फेसबुक वर चुकूनही करू नका ह्या गोष्टी, नाहीतर तुमचे अकाउंट होईल ब्लॉक

सोशल मीडिया म्हणजे आज-काल प्रत्येकाचा जीव की प्राण झालेला आहे. या सोशल मीडिया ला वापरण्यासाठी आपण जी कुठली आवश्यक माहिती असेल ती डोळे झाकून देत असतो. उदाहरणार्थ आपला मोबाईल नंबर, पत्ता इतर गोष्टी. काही गोष्टी आपण सोशल मीडिया वरती शेअर करायला नकोत याचं भान असायला हवं कारण अशा गोष्टी शेअर केल्यामुळे आपण अडचणीत येऊ शकतो. यासोबतच अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या सोशल मीडियावर ती केल्यामुळे आपण अडचणीत येऊ शकतो जाणून घेऊयात.

फेसबुक वापरताना आपण कुठल्याही व्यक्ती किंवा समाजाला उद्देशून हिंसा करण्यासाठी प्रोत्साहित करणारे विधान करू शकत नाही. त्यासोबतच सोशल मीडियाचा गैरवापर करून आपण कुठल्याही व्यक्तीला धमकी सुद्धा देऊ शकत नाही. असं केल्यास आपल्याविरुद्ध तक्रार दाखल होऊ शकते आणि आपल्यावरती निश्चितच कारवाई होऊ शकते.

लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कुठल्याही समुदायाला टारगेट करत त्यांच्याविरुद्ध द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट फेसबूक डिलीट करू शकते. एवढेच नव्हे तर त्या व्यक्तीवर रीतसर तक्रार देखील दाखल होऊ शकते. आपण जर जातीय द्वेष पसरवणाऱ्या बातम्या किंवा विधाने फेसबुक वरती शेअर करत असू तर आपल्यावरती कारवाई होऊ शकते याचा विचार करा आणि यापुढे अशी कृती करू नका.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टी सुकर झाल्या आहेत‌. आज तुम्ही घर बसल्या अनेक प्रकारच्या वस्तू विकू शकता पण मात्र अशा काही गोष्टी आहेत ज्या शासनाच्या दृष्टीने प्रतिबंधित आहेत अशा गोष्टींची जर तुम्ही देवाण-घेवाण सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असाल तर लक्षात ठेवा तुमच्या वरती गंभीर कार्यवाही होऊ शकते.

सोशल लाइफ जगताना रियल लाईफ बद्दल प्रबोधन करणे अत्यंत गरजेचे आहे. या होत्या काही गोष्टी ज्या आपण फेसबुक वर शेअर करायला नकोत.

अपराधाला प्रोत्साहन देणे: सोशल मीडियाच्या या काळात अपराध तेवढच गुन्हेगार आहे त्याला प्रोत्साहन देणारा जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर एखाद्या त्याला प्रोत्साहन देण्यासाठी उदा चोरी गुंडागर्दी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान भांडण मानवी तस्करी अशा प्रकारच्या कुठल्याही गंभीर गुन्ह्याला तुम्ही कुठल्याही मार्गाने प्रोत्साहन देत असाल तुमचं सोशल मीडियाचे अकाउंट ब्लॉक होईलच पण त्यासोबतच तुमच्यावरती गंभीर कार्यवाही देखील होऊ शकते त्यामुळे अशा प्रकारचं काही कृत्य करायच्या आधी नक्कीच विचार करा

Comment here