Skip to content

घरात गरिबी येण्याची काही समज व कारणे ..

  • by

अस कुणाला वाटत का की आपण दुःखी राहावं?? नाही ना पण आपण नकळत केलेल्या चुकीमुळे किंवा काही दिवसांपूर्वी केलेल्या चुकीमुळे आपल्या घरात गरिबी, दारिद्र्य येऊ शकत.. त्या नक्की कोणत्या गोष्टी आहेत आपण बघूया.. जर तुमच्या कडूनही ह्या गोष्टी घडत असतील तर कृपया आजच थांबवा.. कामात आळस, निगेटिव्ह विचार, वेळेचे बंधन न पाळणे, इच्छाशक्ती व आत्मविश्वासाचा अभाव या सोबतच पूर्वजांनी सांगितलेल्या काही सवयी ..

१. फुटलेल्या आरश्यात बघुन तुम्ही केस विंचरता का? किंवा तुटक्या कंगव्याने तुम्ही भांग काढता का? अस जर असेल तर हे थांबवायला हवं. कारण अश्या गोष्टीमुळे घरात दारिद्रय येतं. आणि म्हणून काचेच्या असो किंवा इतर कुठल्याही प्लास्टिक च्या वस्तू जर तूट फूट झाली तर न विसरता लगेच त्याच विसर्जन करावं.

२. तुम्ही कचराकुंडी घरात ठेवता का? किंवा किचन मध्ये ठेवता का? अस असेल तर त्वरित ती घराच्या बाहेर ठेवावी नाही तर घरात दरिद्री देऊ शकते.

३. फाटके कपडे घालू नयेत. जरी तुम्हाला कपडेच नसतील तर तुम्ही आहेत ते कपडे नीट शिवून घालावीत.परंतु बऱ्याच जणांना कपड्यांचा ढीग भरून असतो परंतु सवय असते की घरात फाटके कपडे घालायची ती बंद करावी

४.तसेच काही जणांना नखे दाताने कुरतडण्याची फार वाईट सवय असते..मुलगा असो वा मुलगी हे सगळ्यांच्या बाबतीत असत. त्यामुळे या सवयीचं देखील विसर्जन करावं.

५. दारासमोर पालथी चप्पल दिसल्यास ती सरळ करावी. जर तुम्ही बघून दुर्लक्ष करत असाल तर दरिद्री ही येणारच. अश्या प्रकारे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी टाळून दरिद्री येण्यापासून वाचू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *