Skip to content

Mahadev ki Vishnu- अधिक श्रावणात श्रीविष्णूंचा जप करावा की महादेवाचा ? आणि किती जाणून घ्या.

नमस्कार मित्रांनो.

यंदा १८जुलै २०२३ पासून सुरू होत आहे अधिक श्रावण मास. कोणता जप करायचा कोणत्या देवाची उपसना करायची अधिक श्रावण मासात भगवान श्री विष्णूंचा जप करायचा की महादेवांचा जप करायचा असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर चला जाणून घेऊयात.

यंदा श्रावणाआधी अधिक मास येत आहे १८ जुलै ते १६ ऑगस्ट हा कालावधी असणार आहे यंदा हा अधिक मास श्रावणा आधी आलेला आहे त्यामुळे त्याला अधिक श्रावण असे म्हटले जाईल सालाबाद प्रमाणे नीज श्रावण म्हणतात तो १७ ऑगस्ट पासून सुरू होईल त्यामुळे स्वाभाविकच आहे श्रावण मासातील महादेवाची पूजा करायची नसून नीज श्रावणातच केली पाहिजे.

तर अधिक मास हा भगवान श्री विष्णूंना समर्पित असल्यामुळे त्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. म्हणून श्रीविष्णूंची उपासना केली जाते यात मुख्य भाग असतो तो जपाचा भगवंताच्या नामस्मरणाचे जिभेला आणि मनाला वळण लागावे म्हणून जप केला जातो. भगवंताच्या नामाचा पुनर्विचार मन एकाग्र करायला लावणे हा त्यामागील विचार असतो.

जप केल्यामुळे आचारही शुद्ध होतो अधिक मासात मुख्यत्वे भगवान श्रीहरी विष्णूंचे श्लोक भजन नामस्मरण यांचा पारायण केले जाते अनेक जण रोज एक जपाची माळ ओढायची असते असा संकल्प करतात. अधिक मासात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र १०८ वेळा म्हणतात.

याशिवाय अनेक जण आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करतात जपा ची सवय का लावायची याचे उत्तर शोधायचे असेल, तर संत स्वरूपा नाथ यांच्या ओवी आठवतात हरी भजनाविन काळ घालवू नको रे अंतरीचा दिवा मालवू नको रे चांगल्या गोष्टी आपोआप घडत नाहीत त्या घडवाव्या लागतात. त्यात चांगल्या सवयीला लावाव्या लागतात प्रापंचिक माणसाच्या मुखात नामस्मरण येत नाही ते जाणीवपूर्वक घ्यावे लागते ती सवय लावण्याचे माध्यम म्हणजे जपच्या मळ्यात १०८ मनी असतात त्यात संख्या गणित नाम घेत असतात.

आता जप कसा करावा:- जप करताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाच्या पेरावर माळ धरून अंगठ्याने तिच्यामध्ये आपल्याकडे ओढायचे असतात माळेतील मण्यांची झीज होऊ नये याची दक्षता घ्यावी . मेरू मणी येताच माळा विरुद्ध बाजूने मोजण्यास सुरू करावी. एका व्यक्तीची माळ दुसऱ्या व्यक्तीने वापरू नये. माळ वापरून झाल्यावर माळेला नमस्कार करावा. पवित्र ठिकाणी जपमाळ ठेवावी शक्यतो एखाद्या कापडी पिशवीतून किंवा डब्यातून माळ ठेवावी.

जप माळ्याची संख्या एका एक न वाढवता क्रमाक्रमाने वाढवावी मन केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा शुद्ध मनाने नामस्मरण घ्यावे जप करताना मन शांत व्हावे यासाठी शांत परिसराची निवड करावी. सुखासनात बसून डोळे मिटून जप करावा आपल्याला एक वाईट खोड असते ती म्हणजे नामस्मरण सुरू करतानाच जपमाळ इकडे पाहण्याची जेमतेम दहा मणी ओलांडून होत नाहीत तोच आपले लक्ष जपमाळेकडे जाते याचा अर्थ आपले मन केवळ नामस्मरणात नसून सोपस्कारात अडकलेले आहे.

जप साधनेचा मंत्र पाप पुण्याची नसून आपल्या आचार विचारांशी निगडित आहे. म्हणूनच त्या सरावाला जप साधना म्हटले जाते. ज्याप्रमाणे एखादे शुभाषेध श्लोक जप कविता गाणे पाठ होण्यासाठी आपण शंभर वेळा घोकणपथ तसेच भगवानचे नाव घेण्यासाठी १०८ ही संख्या सुनिश्चित केली पाहिजे.

जप साधनेत एवढ्यावर थांबून जायचे नाही इथून तर सुरुवात आहे असे म्हटले जाते. आपणही मध्ये न थांबता मेरू म्हणे हाताला लागेपर्यंत अखंड जप सुरू ठेवावा. तर अशाप्रकारे अधिक मासात भगवान श्री हरी विष्णूंची उपासना करावी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *