Skip to content

ब्रिटिश काळापासून वकील काळा कोट आणि पांढरा शर्टच का वापरतात?

  • by

आजकाल बहुतेक लोकांना माहित नाही की, वकील हे काळे कोट आणि पांढरे शर्ट का परिधान करतात. या जगात प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतेच.तुम्हाला माहित असेल प्रत्येक रंग हा आपल्या मनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करतात.वकिलांच्या कोटाचा संबंध थेट ब्रिटिश राजवटीशी येतो.

अशा अनेक पद्धतीप्रमाणं ही पध्दतही आपण ब्रिटिशांकडून घेतली आहे. १३२७ साली वकिलांच्या ड्रेस कोडची सुरुवात एडवर्ड तिसरा यांनी केली. त्याकाळी रॉयल कोर्टामध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक न्यायाधीशाला एक पेहरावा असावा असे सुचवले. त्यात कोणीही बदल करू शकत नाही. त्याकाळी सार्जंट आपल्या डोक्यावर केसांचा विग घालून बसायचे.

सेंट पेल्सकॅथेड्रलमध्ये प्रॅक्टिस करायचे. तेव्हा वकिलांची स्टुडंट, प्लीडर, बेंचर आणि बॅरिस्टर या चार भागात विभागणी करण्यात आली होती. सोनेरी लाल कपडे आणि खाकी रंगाचा गाऊन त्या काळात वापरत असत. १६०० साली या ड्रेस कोडमध्ये काहीसा बदल करण्यात आला. १६३७ साली प्रिवी काउन्सिलने सांगितले की, समाजानुसार कपडे परिधान करावीत. तेव्हापासून वकिलांना पूर्ण अंग झाकता येईल एवढे वस्त्र परिधान करण्यास सांगितले. तेव्हापासून त्यांनी पूर्ण अंग झाकता येईल एवढ्या लांबीचा गाऊन घालण्यास सुरुवात केली. हा पेहरावा त्यांना सर्व व्यक्तीपासून वेगळा दर्शवायचा होता.

१६९४ साली राणी मेरीच्या मृत्यूनंतर, राजा विल्यम याने सर्व न्यायाधीश आणि वकिलांना राणीच्या शोकाचे प्रतीक म्हणून, काळा गाऊन परिधान करून न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले. तेव्हापासून राजा विल्यमने दिलेला आदेश कधीही मागे घेतला नाही. तेव्हापासून वकील आणि न्यायधीश यांचा काळ्या रंगाचा ड्रेस कोड झाला. त्याबद्दल कोणीही बंधन घातले नाही. सर्वांनी काळ्या रंगाचा पेहरावा मान्य केला. भारतात अधिनियम १९६१ च्या अंतर्गत, पांढरा बँड सह काळा कोट वा गाऊन परिधान करणे अनिवार्य आहे.

असे समजले जाते की, या पेहरावयामुळे वकिलांमध्ये एक शिस्त जोपासली जाते व त्याच्यामध्ये न्यायाने लढण्याचा विश्वास निर्माण होतो. हा पेहराव त्यांना शांत सन्मानजनक स्वरूप प्रदान करतो. काळा रंग हा उच्चभ्रू दर्जा दर्शवतो. निःपक्षपातीपणा आणि अधिकाराचे प्रतीकही हा रंग समजला जातो. पांढऱ्या आणि काळ्या रंगाचं मिश्रण हे औपचारिकतेचेही प्रतीक आहे. या पेहराव्यामुळे वकील आणि न्यायाधीश यांना समाजात ओळखले जाते.

काळा रंगाचा पेहरावा परिधान करण्यामागे एक असा दावा केला जातो की, काळा रंग एक असा रंग आहे की त्याच्यावर इतर कोणतेही रंग चित्रित केले जाऊ शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *