Skip to content

यंदाची आषाढी वारी होणार की नाही? काय आहे नियमावली.

  • by

आषाढी वारी पायी सोहळा हा जवळ आला आहे, महाराष्ट्र भरातून लाखो वारकरी हे आषाढी पायी वारीसाठी येत असतात आणि आषाढ महिना आता जवळ आला आहे त्यामुळे आषाढी वारीचे नेमकं काय हा प्रश्न सर्वांना पडलेला आहेच, त्याचमध्ये फलटणचे मुख्याधिकारी श्री संजय गायकवाड यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांना पत्र लिहिले आहे व त्यात त्यांनी असे म्हणाले आहे की “सध्या फलटण शहर आणि संपूर्ण तालुक्यामध्ये कोरोनाचे अनेक रुग्ण आहेत आणि येथील परिस्थिती भयंकर आणि भीतीदायक आहे, संपूर्ण फलटण शहरामध्ये कोरोनाबाधित अनेक रुग्ण अलीकडच्या काळात सापडले आहे आणि हे चिंताजनक आहे, त्याच पार्श्वभूमीवर फलटणचे मुख्याधिकारी यांनी आळंदी देवस्थानला पत्र लिहिले आहे की यंदा आषाढी वारी सोहळा नको. आळंदी देवस्थानने आषाढी वारी मार्गावरील सर्व प्रधासनाला पत्रव्यवहार केला होता १६ मे २०२१ रोजी फलटण नगरपालिकेस पत्र प्राप्त झाले होते.

गेल्या वर्षी पासून बंद असलेल्या आषाढी वारी सोहळ्याला पोषक वातावरण आहे का ? गावात कोरोना महामारीची परिस्थिती कशी आहे? अश्या आशयाचे प्रश्न विचारण्यात आले होते त्याला अनुसरून फलटण नगरपालिकेने पत्र लिहून परिस्थिती सांगितलेली आहे.

अशीच परिस्थिती राहिली आणि त्यात आषाढी वारी सोहळा झाला तर स्थानिक ग्रामस्थ,भाविक व नागरिकांच्या जीवाशी खेळल्यासारखे होईल, त्यामुळे गतवर्षीप्रमाणे एस.टी. तून आषाढी वारी सोहळा होणं हे सर्वांसाठी उचित राहील अस ते म्हणाले, त्याचप्रमाणे ज्या वेळेस कोरोना परिस्थिती सुधारेल त्याचवेळी पायी वारी सोहळ्याबाबतीत मत व्यक्त करणे उचित ठरेल अस ही ते म्हणाले.

अशीच परिस्थिती पुढे राहिली तर फलटण पालखी तळावर प्रशासनाच्या वतीने आम्ही कोणतीही सुविधा नगरपालिकेच्या वतीने पुरवू शकणार नाही, कोरोना परिस्थिती जर सुधारली तर पूर्वीप्रमाणे सुविधा पुरवणे नगरपालिकेला शक्य होईल असं पत्रामध्ये श्री संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *